अकोटात संत सेना महाराज पुण्यतिथी महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:23 IST2021-09-06T04:23:52+5:302021-09-06T04:23:52+5:30

------------------------------ माहेश्वरी भवनातही कार्यक्रम स्थानिक माहेश्वरी भवन येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने संत सेना महाराज पुण्यतिथी महोत्सव आयोजित केला ...

Sant Sena Maharaj Punyatithi Festival in Akota | अकोटात संत सेना महाराज पुण्यतिथी महोत्सव

अकोटात संत सेना महाराज पुण्यतिथी महोत्सव

------------------------------

माहेश्वरी भवनातही कार्यक्रम

स्थानिक माहेश्वरी भवन येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने संत सेना महाराज पुण्यतिथी महोत्सव आयोजित केला होता. यावेळी प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष संजय भट्टी यांची होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिदास धानोरकर, तर प्रमुख अतिथी म्हणून सुरेश अंबुलकर, महादेवराव हिरपूरकर, राजू महाराज खापरकर, विजयराव निंबाळकर, राजेश भट्टी, मधुकर बुढळकर, राजेश महानकर, गजानन निंबोकर, सुनील अंबुलकर, रवींद्र सावरकर, राजेश नांदूरकर, शंकरराव अतकरे, आदींची उपस्थिती होती. यावेळी नाभिक दुकानदार संघटनेच्या रेटबोर्डचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला अशोक खापरकर, मोहन अंबुलकर, गोपाल उन्नत्कर, दशरथ मिसळकर, सुधीर बुढळकर, पवन बोपुलकर, प्रवीण सावरकर, संदीप लापुरकर, विजय निंबोकर, पवन अंबुलकर, नरेश भट्टी, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे तालुकाध्यक्ष संतोष हिरपूरकर यांनी, तर संचालन पुण्यतिथी महोत्सवाचे अध्यक्ष आकाश निंबोळकर यांनी केले. आभार मिथुन ढगे यांनी मानले.

Web Title: Sant Sena Maharaj Punyatithi Festival in Akota