जिल्हा परिषद शाळेत संत गाडगेबाबा जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:20 IST2021-02-24T04:20:21+5:302021-02-24T04:20:21+5:30

पारस : जि. प. प्राथमिक मराठी कन्या शाळा व मुलांची शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मयोगी संत गाडगे महाराज ...

Sant Gadge Baba Jayanti celebration at Zilla Parishad School | जिल्हा परिषद शाळेत संत गाडगेबाबा जयंती साजरी

जिल्हा परिषद शाळेत संत गाडगेबाबा जयंती साजरी

पारस : जि. प. प्राथमिक मराठी कन्या शाळा व मुलांची शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मयोगी संत गाडगे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कन्या शाळेचे मुख्याध्यापक गजानन करांगळे होते. यावेळी शिक्षक विजय अहिर, विभूती हाडोळे, नीलेश गिर्हे, प्रीती झापर्डे आदींसह शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यक्ष तथा उपस्थितांच्या हस्ते संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. मुलांच्या शाळेतील विद्यार्थी आदेश आमले याने संत गाडगे बाबांची वेषभूषा साकारून त्यांना आदरांजली अर्पण केली. अध्यक्ष तसेच उपस्थितांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमासाठी गीता धरमकार, ज्योती खंडारे, ऋषिकेश खेरडे, देवाशिष कुळकर्णी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलेश गिर्हे यांनी केले तर आभार विजय अहिर यांनी मानले.

Web Title: Sant Gadge Baba Jayanti celebration at Zilla Parishad School