संजय खडसे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे नवे कुलसचिव

By राजेश शेगोकार | Updated: May 7, 2023 12:57 IST2023-05-07T12:55:56+5:302023-05-07T12:57:00+5:30

अमरावती येथेही त्यांनी महसूल विभागात सेवा दिली आहे.

Sanjay Khadse is the new Chancellor of Punjabrao Deshmukh Agricultural University | संजय खडसे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे नवे कुलसचिव

संजय खडसे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे नवे कुलसचिव

राजेश शेगोकार 

अकोला: येथील  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलसचिव पदी अकोल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संजय खडसे हे महसूल विभागात कार्यरत असून नायब तहसीलदार ते उपजिल्हाधिकारी पर्यंत त्यांचे प्रशासकीय सेवा राहिली आहे या कार्यकाळात सामाजिक बांधिलकी जोपासणारे अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे अकोला वाशिम बुलढाणा यासह यवतमाळ.

अमरावती येथेही त्यांनी महसूल विभागात सेवा दिली आहे. सध्या ते अकोल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असून त्यांना तीन वर्षासाठी प्रतिनियुक्तीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलसचिव म्हणून नियुक्ती करण्यात दीली आहे नियुक्ती संदर्भात आठवडाभरात प्रक्रिया पूर्ण करून ते पदभार घेतील, अशी माहिती आहे. राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाचे सचिव डॉ माधव वीर यांच्या स्वाक्षरीने खडसे यांच्या प्रतिनिधीचा आदेश काढलेला आहे

Web Title: Sanjay Khadse is the new Chancellor of Punjabrao Deshmukh Agricultural University