रेतीने भरलेला मिनीट्रक उलटला; १ ठार, १ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 16:54 IST2019-03-01T16:53:56+5:302019-03-01T16:54:01+5:30
नया अंदुरा : कारंजा (रम) - हातरूण मार्गवर वाळूने भरलेला एम-३० एबी-८२८ क्रमांकाचा टाटा ४०७ मेटॅडोर चालकाचे नियंत्रण सुटल्याने एका शेतांमध्ये जाऊन उलटल्याची घटना १ मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

रेतीने भरलेला मिनीट्रक उलटला; १ ठार, १ जखमी
नया अंदुरा : कारंजा (रम) - हातरूण मार्गवर वाळूने भरलेला एम-३० एबी-८२८ क्रमांकाचा टाटा ४०७ मेटॅडोर चालकाचे नियंत्रण सुटल्याने एका शेतांमध्ये जाऊन उलटल्याची घटना १ मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यामध्ये मजुर मंगेश सोनाजी रायबोले रा.करतवाडी (रेल्वे) ता.आकोट याचा उपचारा दरम्यान सर्वोपचार रूग्णालय अकोला येथे मृत्यु झाला. तर आणखी एक ईसम या दुर्घटनेत गंभीर जखमी असुन सर्वोपचार रूग्णालयात उपचार घेत आहेत. या घटनेचा उरळ पोलीसांत गुन्हा दाखल झाला.असुन पुढील तपास ठाणेदार सतिष पाटील यांचे मार्गदर्शनाखाली उरळ पोलीस करीत आहेत.