शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

वाळूमाफीयांचा पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 18:06 IST

पोलिसांनी प्रसंगावधान राखल्याने त्यांचे प्राण वाचले.

हिवरखेड: वान नदी तसेच नाल्यामधून मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध वाहतूक सुरू असताना शुक्रवारी दोन टिप्परला पकडण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. यावेळी टिप्पर चालकाने पोलिसांच्या दुचाकीवर वाहन चालवून दुचाकी चिरडली. पोलिसांनी प्रसंगावधान राखल्याने त्यांचे प्राण वाचले.हिवरखेड पोलीस ठाण्याचे कर्मचारी आकाश राठोड हे कर्तव्यावर असताना दानापूरकडून दोन टिप्पर येत असल्याचे दिसले. त्यावेळी आकाश राठोड यांनी समोरून येणाऱ्या दोन टिप्पर टाटा कंपनीचे यांना थांबविण्याचा इशारा केला. यामधील टिप्पर चालकाने भरधाव वाहन अंगावर आणून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यामधील चालकाने काही वाळू हेड्रोलिकच्या साहाय्याने खाली टाकली तसेच मागून येणाºया टिप्पर चालकाने अंगावर टिप्पर आणून जखमी केले. तसे पुढे दोन्ही टिप्पर तळेगाव मार्गे अडगावकडे जात असता पोलीस कर्मचारी नीलेश खंडारे यांनी वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता, खंडारे यांच्या दुचाकीवर वाहन नेले. त्यामध्ये वाहनावर असलेल्या राठोड यांनी उडी घेतली. यासंदर्भात पोलीस स्टेशनला माहिती दिली. शासकीय वाहन घेऊन महादेव शेंडे, शिवा गावंडे यांनी सदर वाहनाचा पाठलाग केला असताना वाहने मुंडगाव रोडवर लामकाणीकडे एक टिप्पर गेला. दुसरा टिप्पर चालक टिप्पर जागेवर सोडून पळाला. आकाश राठोड यांच्या फिर्यादीवरून टिप्पर क्र. एमएच २८ बीबी १४१९ व विनानंबर टिप्पर चालकाविरुद्ध भादंवि कलम ३0७, ३५३, ३७९, १८६, ४२१, ३२ अन्वये गुन्हा दाखल केला. तपास ठाणेदार आशिष लव्हंगळे पोलीस कर्मचारी करीत आहेत. (प्रतिनिधी)

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी