अकोल्याची साना खडसे ठरली ज्युनिअर महाराष्ट्र सौंदर्य स्पर्धेची मानकरी

By Atul.jaiswal | Updated: March 11, 2023 13:44 IST2023-03-11T13:42:24+5:302023-03-11T13:44:45+5:30

क्रिएटिव्ह ग्रुप, छत्रपती संभाजीनगरच्या वतीने जानेवारी महिन्यात जिल्हास्तरावर घेण्यात आलेल्या ऑडिशनमध्ये महाराष्ट्र स्तरावर निवड झालेल्यांची पुणे येथील एका हॉटेलमध्ये ४ व ५ मार्च रोजी स्पर्धा घेण्यात आली

Sana Khadse of Akola became the champion of Junior Maharashtra beauty Competition | अकोल्याची साना खडसे ठरली ज्युनिअर महाराष्ट्र सौंदर्य स्पर्धेची मानकरी

अकोल्याची साना खडसे ठरली ज्युनिअर महाराष्ट्र सौंदर्य स्पर्धेची मानकरी

अकोला - क्रिएटिव्ह ग्रुपच्यावतीने पुणे येथे पार पडलेल्या ज्यूनिअर महाराष्ट्र सीजन ३ ग्रुप सी मधून अकोल्याची साना संजय खडसे हिने प्रथम क्रमांक प्राप्त करून या स्पर्धेचा विजेता होण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. ब गटात शरण्या गणेश भाकरे विजेती, तर चिन्मय मंदार सावजी उपविजेता ठरला. सामिया अब्दुल इरफान हिला बेस्ट वॉक पुरस्कार मिळाला. अ गटात निष्ठा मंदार सावजी हिला उत्कृष्ट स्माईल आणि आईज पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

क्रिएटिव्ह ग्रुप, छत्रपती संभाजीनगरच्या वतीने जानेवारी महिन्यात जिल्हास्तरावर घेण्यात आलेल्या ऑडिशनमध्ये महाराष्ट्र स्तरावर निवड झालेल्यांची पुणे येथील एका हॉटेलमध्ये ४ व ५ मार्च रोजी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये सर्व स्पर्धकसाठी चार राऊंड घेण्यात आले. त्यामध्ये अकोल्याच्या साना खडसे हिने पारंपरिक ड्रेस मध्ये परिचय, कौशल्य (टॅलेंट )सादरीकरण, रॅम्प वॉक, जनरल नॉलेज वर आधारित प्रश्नाची उत्तरे, एक मिनिटांमध्ये वेळेवर येणाऱ्या विषयावर, माहिती देणे, व ज्यूरी राऊंड इ मध्ये आत्मविश्वासाने अभ्यासपूर्ण सादरीकरण केले, आणि ज्यूरी सोबत उपस्थित सर्वांची मने जिंकून सर्वाधिक गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक प्राप्त केला. मिसेस युनिव्हर्सल २०१७ पल्लवी कौशिक व क्रिएटिव्ह ग्रुपचे संचालक रवी जयस्वाल यांच्या हस्ते जूनियर महाराष्ट्र सौंदर्यवती विजेता मुकुट घालून सानाचा सन्मान करण्यात आला.

लहानपणापासून घेतलेले शिक्षण, ज्ञान, आणि आत्मविश्वासाच्या जोरावर, हे यश संपादन केले असल्याचे सानाने सांगितले. या स्पर्धेचे जुरी म्हणून पल्लवी कौशिक, जस्मीन, मंजुषा मुळीक, रुपाली, राजेश चंचलांनी यांनी काम पाहिले.

Web Title: Sana Khadse of Akola became the champion of Junior Maharashtra beauty Competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.