संभाजी ब्रिगेड राज्यात ३० जागांवर लोकसभा निवडणूक लढणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 15:10 IST2019-01-11T14:28:06+5:302019-01-11T15:10:48+5:30
अकोला : संभाजी ब्रिगेड राज्यात ३० जागांवर लोकसभा निवडणूक लढविणार आहे. स्वत:चे अस्तित्व दाखविण्यासाठी संभाजी ब्रिगेडने हे पाऊल उचलले असून, समविचारी पक्ष संपर्कात असल्याची माहिती गुरुवारी अकोल्यात पत्रकार परिषेदत देण्यात आली.

संभाजी ब्रिगेड राज्यात ३० जागांवर लोकसभा निवडणूक लढणार!
अकोला : संभाजी ब्रिगेड राज्यात ३० जागांवर लोकसभा निवडणूक लढविणार आहे. स्वत:चे अस्तित्व दाखविण्यासाठी संभाजी ब्रिगेडने हे पाऊल उचलले असून, समविचारी पक्ष संपर्कात असल्याची माहिती गुरुवारी अकोल्यात पत्रकार परिषेदत देण्यात आली. पत्रकार परिषदेला विभागीय अध्यक्ष पंकज जायले, जिल्हाध्यक्ष गोपीअण्णा चाकर, अभिजित मोरे, महानगराध्यक्ष पवन महल्ले व प्रा. संदीप निर्मळ प्रामुख्याने उपस्थित होते.
संभाजी ब्रिगेड अकोला-बुलडाणा लोकसभा मतदारसंघांसह राज्यात ३० तर विधानसभेच्या २८८ जागांपैकी शंभर जागा लढण्यास तयार आहे. फुले, शाहू, आंबेडकर विचारांच्या राजकीय पक्षांना सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न आहे; मात्र युतीसंदर्भातील सर्व निर्णय प्रदेश पदाधिकारी घेणार आहेत. महाराष्ट्रातील बाराशे वक्त्यांची फौज निवडणुकीत प्रचार करणार आहे. भाजपच्या ‘आरएसएस’ प्रचारकांना शह देण्यासाठी आता ‘एमएसएस’ (मराठा सेवा संघ) कार्यरत आहे. मागील स्थानिक स्वराज्य संस्था व ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये आम्ही तीन लाख मते मिळविली आहेत. जनतेचा प्रतिसाद बघता आता मतांची संख्या वाढणार असा आम्हाला विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले गेले. आतापर्यंत आम्ही आंदोलने केली आता थेट सत्ता मिळविण्यासाठी निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले.