तेल्हारा येथे दारू विक्री; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:14 IST2021-05-03T04:14:29+5:302021-05-03T04:14:29+5:30

पोलीस निरीक्षक नितीन देशमुख पोलीस कर्मचाऱ्यांसह शनिवारी पेट्रोलिंग करीत असताना गुप्त माहिती मिळाल्याने शहरातील टॉवर चौकातील गणात्रा लॉजमध्ये छापा ...

Sale of liquor at Telhara; Filed a crime | तेल्हारा येथे दारू विक्री; गुन्हा दाखल

तेल्हारा येथे दारू विक्री; गुन्हा दाखल

पोलीस निरीक्षक नितीन देशमुख पोलीस कर्मचाऱ्यांसह शनिवारी पेट्रोलिंग करीत असताना गुप्त माहिती मिळाल्याने शहरातील टॉवर चौकातील गणात्रा लॉजमध्ये छापा टाकला असता पोलिसांनी अवैध विनापरवाना दारूची विक्री करताना हितेंद्र मथुरादास गणात्रा ( ४०, रा.तेल्हारा) मिळून आला. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता देशी दारू संत्रा १८० मिलीचे सीलबंद नऊ क्वॉर्टर अंदाजे किंमत ६३० रुपये, देशी दारूचे सीलबंद पाच क्वार्टर किंमत ३५० रुपये असे एकूण ३ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गजानन श्रीराम इंगळे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या ६५ नुसार कारवाई केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक देशमुख, हेड कॉन्स्टेबल तायडे, पोलीस हवालदार निखाडे, पोलीस कॉन्स्टेबल शुक्ला यांनी केली.

Web Title: Sale of liquor at Telhara; Filed a crime