शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
6
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
7
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
8
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
9
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
10
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
11
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
12
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
13
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
14
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
15
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
16
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
17
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
18
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
19
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
20
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी

विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर येणार आरटीई शेरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 11:09 IST

RTE remarks will appear on students' marksheet : पास किंवा नापास असा शेरा देण्याऐवजी आरटीईनुसार वर्गोन्नत असा शेरा दिला जाणार आहे.

ठळक मुद्दे विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात पाठविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.यंदाचे नुकसान भरून काढण्यासाठी कृती कार्यक्रम आखण्यात येणार आहे.

अकोला : कोरोनामुळे परीक्षा न घेताच, विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात पाठविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र, या विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे गुणपत्रिका दिल्या जाणार असून, त्यावर पास किंवा नापास असा शेरा देण्याऐवजी आरटीईनुसार वर्गोन्नत असा शेरा दिला जाणार आहे.

राज्य मंडळाच्या शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ८ एप्रिल रोजी हा नवीन निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ६ एप्रिल रोजी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढच्या वर्गात पाठविण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर राज्य शैक्षणिक व संशोधन व प्रशिक्षण परिषदेने विद्यार्थ्यांबाबत नेमकी कार्यवाही कशी करावी याच्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार यंदा कोरोनाच्या कारणामुळे ज्या विद्यार्थ्यांचे  संकलित मूल्यमापन करता आले नाही त्यांना आरटीई कायद्याच्या कलम १६ नुसार पुढच्या वर्गात वर्गोन्नत करण्यात येणार आहे. मात्र, त्यांच्या प्रगती पुस्तकावर आरटीई ॲक्ट २००९ कलम १६ नुसार वर्गोन्नत असा शेरा राहणार आहे. राज्यात पाचवी ते आठवीच्या शाळा १५ दिवसांसाठी सुरू करण्यात आल्या होत्या. तर अनेक ठिकाणी पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात आले. अशा विद्यार्थ्यांचे शाळांकडून  संकलित मूल्यमापन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनातील संपादणूक लक्षात घेऊन त्याचे रूपांतर १०० गुणांमध्ये करण्यात येणार आहे. त्यानुसार त्यांची श्रेणी निर्धारित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

शाळेत विशेष प्रशिक्षणाचे निर्देश

यंदा ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता, पुढच्या वर्गात पाठविण्यात येणार आहे त्यांचा अभ्यास मागे पडण्याची भीती आहे. त्यामुळे पुढील सत्राच्या सुरुवातीलाच शाळेत विशेष प्रशिक्षण आयोजित करण्याचे निर्देशही राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिले आहेत. त्यात विद्यार्थी मित्र या पुस्तिकेचा आधार घेऊन नियमित वर्गाध्यापन करण्याचेही निर्देश आहेत. तसेच यंदाचे नुकसान भरून काढण्यासाठी कृती कार्यक्रम आखण्यात येणार आहे.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीRight To Educationशिक्षण हक्क कायदाexamपरीक्षा