लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हय़ातील ४६ खासगी प्राथमिक शाळांमध्ये शिकविणार्या प्लॅनमधील ३00 शिक्षकांचे डिसेंबर २0१६, जानेवारी व फेब्रुवारी २0१७ आणि डिसेंबर २0१७ या चार महिन्यांचे वेतन गत वर्षभरापासून रखडले आहे. जवळपास दोन कोटी रुपयांचे वेतन रखडल्याने, शिक्षक प्राथमिक विभागाच्या वेतन पथक अधीक्षक कार्यालयाचे उंबरठे झिजवित असल्याबाबतचे वृत्त लोकमते १५ जानेवारी रोजी प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत, शासनाने तात्पुरत्या स्वरूपात का होईना, डिसेंबर २0१७ या महिन्याच्या वेतनासाठी राज्यातील सर्वच प्लॅनमधील शिक्षकांसाठी २0 कोटी रुपये मंजूर केले. यातील ६५ लाख रुपयांचा निधी अकोल्यातील शिक्षकांसाठी देण्यात येणार आहे. जिल्हय़ातील ५00 च्यावर शिक्षक हे नॉनप्लॅनमध्ये येतात आणि ३00 शिक्षक हे प्लॅनमध्ये आहेत. त्यामुळे या ३00 शिक्षकांना वेतनासाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागतो. त्यातही अनेकदा अन्याय होतो. वर्षातून एक किंवा दोन महिन्यांचे वेतन प्रलंबित राहते. त्यासाठी शिक्षकांना सातत्याने प्राथमिक शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करावा लागतो; परंतु पाठपुरावा करूनही शिक्षकांना त्यांच्या हक्काच्या वेतनापासून वंचित राहावे लागते. यासंदर्भात शिक्षकांनी पुणे येथे शिक्षण आयुक्त कार्यालयाकडे तक्रारी केल्या होत्या. यासंदर्भात लोकमतनेसुद्धा वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत, शासनाने प्लॅनमधील शिक्षकांना डिसेंबर २0१६, जानेवारी, फेब्रुवारी २0१७ या तीन महिन्यांचे वेतन देण्याऐवजी केवळ डिसेंबर २0१७ या महिन्यांचे २0 कोटी रुपये वेतन मंजूर केले. त्यातील ६५ लाख रुपयांचा निधी अकोल्यातील ३00 शिक्षकांच्या वेतनासाठी देण्यात येईल. उर्वरित तीन महिन्यांच्या प्रलंबित वेतनाचे देयक अदा करण्यासाठी ब्रोकन टॅब उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. ही टॅब पुणे येथील शिक्षण संचालकांनी उपलब्ध करून दिल्यानंतरच निधीची तरतूद करण्यात येईल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले.
अकोला जिल्हय़ातील ‘त्या’ ३00 शिक्षकांच्या वेतनासाठी ६५ लाख रुपये मंजूर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 01:32 IST
अकोला : जिल्हय़ातील ४६ खासगी प्राथमिक शाळांमध्ये शिकविणार्या प्लॅनमधील ३00 शिक्षकांचे डिसेंबर २0१६, जानेवारी व फेब्रुवारी २0१७ आणि डिसेंबर २0१७ या चार महिन्यांचे वेतन गत वर्षभरापासून रखडले आहे. जवळपास दोन कोटी रुपयांचे वेतन रखडल्याने, शिक्षक प्राथमिक विभागाच्या वेतन पथक अधीक्षक कार्यालयाचे उंबरठे झिजवित असल्याबाबतचे वृत्त लोकमते १५ जानेवारी रोजी प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत, शासनाने तात्पुरत्या स्वरूपात का होईना, डिसेंबर २0१७ या महिन्याच्या वेतनासाठी राज्यातील सर्वच प्लॅनमधील शिक्षकांसाठी २0 कोटी रुपये मंजूर केले. यातील ६५ लाख रुपयांचा निधी अकोल्यातील शिक्षकांसाठी देण्यात येणार आहे.
अकोला जिल्हय़ातील ‘त्या’ ३00 शिक्षकांच्या वेतनासाठी ६५ लाख रुपये मंजूर!
ठळक मुद्देतूर्तास एक महिन्याचे वेतन, उर्वरित तीन महिन्यांचे वेतनासाठी लवकरच निधी