अकोला: माळीपुरा परिसरातील देहविक्रय करणार्या एका महिलेकडे गेलेल्या एका इसमास शस्त्राचा धाक दाखवून त्याच्याकडील ६00 रुपये हिसकावून घेतले. या प्रकरणी इसमाने रामदासपेठ पोलीस ठाण्यात गुरूवारी तक्रार दिली. एक ४0 वर्षीय इसम माळीपुरा परिसरात राहणार्या देहविक्रय करणार्या एका महिलेकडे गेला होता. या ठिकाणी काही जणांनी त्याला शस्त्राचा धाक दाखविला आणि धक्काबुक्की करीत त्याच्याकडील ६00 रुपये हिसकावून घेतले. त्यामुळे घाबरलेला हा इसम तक्रार देण्यासाठी कोतवाली पोलीस ठाण्यात आला. परंतु घटनास्थळ हे रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने त्याला तेथून रवाना करण्यात आले. गुरुवारी त्याने रामदासपेठ पोलीस ठाण्यात घटनेची रितसर तक्रार दिली. परंतु पोलिसांनी ही तक्रार चौकशीत ठेवली.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}