गुंगीचे चॉकलेट देऊन लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2016 01:29 IST2016-08-05T01:29:05+5:302016-08-05T01:29:05+5:30

सिव्हिल लाइन पोलिसांत गुन्हा दाखल.

Robbed robbery by giving a lump of chocolate | गुंगीचे चॉकलेट देऊन लुटले

गुंगीचे चॉकलेट देऊन लुटले

अकोला: पुणे ते अकोला बसगाडीमध्ये बसलेल्या सिडको कॉलनी औरंगाबाद येथील किसन रतन सरदार यांना गुंगीचे चॉकलेट देऊन अज्ञात चोरट्याने ४७ हजार रुपयांनी लुटले. याप्रकरणी गुरुवारी ११.३0 वाजताच्या सुमारास सिव्हिल लाइन पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
सरदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सिडको बसस्थानकावरून पुणे ते अकोला गाडीत बसले. जालनानजीक त्यांच्या शेजारी बसलेल्या अज्ञात चोरट्याने त्यांनी गुंगीचे चॉकलेट दिले. बेशुद्ध झाल्यावर चोरट्याने त्यांच्याकडील रोख १६ हजार, बोटातील १0 ग्रॅमची सोन्याची अंगठी आणि मोबाइल असा एकूण ४७ हजार ५00 रुपयांचा ऐवज लंपास केला.

Web Title: Robbed robbery by giving a lump of chocolate