रस्त्याचे काम वर्षापासून प्रलंबित
By Admin | Updated: May 31, 2014 21:54 IST2014-05-31T19:12:22+5:302014-05-31T21:54:31+5:30
मूर्तिजापूर तालुक्यातील सिरसो येथील रस्त्याचे काम एक वर्षापासून प्रलंबित; ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात.

रस्त्याचे काम वर्षापासून प्रलंबित
सिरसो - मूर्तिजापूर तालुक्यातील सिरसो बसस्टॅँड ते गावापर्यंतच्या रस्त्याचे काम एक वर्षापासून प्रलंबित असून, गावकर्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा परिषदेच्या निधीतून सन २०१२ ते २०१३ कालावधीसाठी १५ लाखांचा हा रस्ता प्रस्तावित करण्यात आला. सुरुवातीला कामाला सुरुवातही झाली, यानंतर मात्र काम बंद पडले. रस्ता ठिकठिकाणी खोदला असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. ५ जूनपर्यंत कामाला प्रत्यक्ष सुरुवात न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा गावकर्यांनी दिला आहे.