टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; एक जण गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 17:39 IST2018-04-11T17:39:54+5:302018-04-11T17:39:54+5:30

टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; एक जण गंभीर जखमी
अकोला: टिप्पलने मोटारसायकलला जबर धडक दिल्याने मोटारसायकल चालक जागीच ठार झाला तर सहकारी गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी दुपारी 4 वाजता चौकात खदान पोलीस ठाण्यासमोर घडली.
सिंदखेड येथील प्रमोद ज्ञानदेव काळदाते असे मृतकाचे नाव आहे. त्याच्यासोबत असलेला सहकारी योगेश रामदास कोगदे हा गंभीर जखमी झाला आहे. हे दोघेही बार्शिटाकळी येथून लग्न समारंभ आटोपल्यानंतर घरी जात होते. भरधाव टिप्परने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात प्रमोद ज्ञानदेव काळदाते याचा जागीच मृत्यू झाला. अपघातात जखमी झालेल्या युवकास उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.