चाकूच्या धाकावर अंगठी, सात हजार रुपये हिसकले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:14 IST2021-06-29T04:14:23+5:302021-06-29T04:14:23+5:30

बार्शीटाकळी : बार्शीटाकळी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या चोहोगाव शेतशिवारात सोमवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान ग्रामसेवक युनियनचे माजी जिल्हाध्यक्ष अशोक ...

Ring on a knife, snatched seven thousand rupees! | चाकूच्या धाकावर अंगठी, सात हजार रुपये हिसकले!

चाकूच्या धाकावर अंगठी, सात हजार रुपये हिसकले!

बार्शीटाकळी : बार्शीटाकळी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या चोहोगाव शेतशिवारात सोमवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान ग्रामसेवक युनियनचे माजी जिल्हाध्यक्ष अशोक उत्तमराव कोहर यांना चाकूचा धाक दाखवून मारहाण करीत बोटातील सोन्याची अंगठी व खिशातील सात हजार रुपये हिसकावून आरोपी पसार झाल्याची घटना घडली. याप्रकरणात एका अज्ञात आरोपीसह तिघांविरुद्ध बार्शीटाकळी पोलिसात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आला.

अशोक कोहर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते दुचाकीने लोहगड-चोहोगाव रस्त्याने प्रवास करीत असताना शिवारातील भगवान बाहकर यांच्या शेताजवळ आरोपी विलास शिवदास इंगळे, संतोष मधुकर इंगळे (रा. चोहोगाव) व अज्ञात आरोपींनी गाडी थांबविली. मारहाण करून अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच हाताच्या बोटातील अंदाजे सात ग्रॅम वजनाची पंचवीस हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी व खिशातील सात हजार रुपये काढून पळ काढला. याप्रकरणी बार्शीटाकळी पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी विलास इंगळे, संतोष इंगळे व अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Ring on a knife, snatched seven thousand rupees!