शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

ज्वारीच्या दोन जातींचे पंदेकृविने केले संशोधन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 01:59 IST

अकोला : ज्वारी हे शाश्‍वत पीक आहे. यात सर्वाधिक  पोषणमूल्य सुरक्षा असल्याने अकोल्याच्या डॉ. पंजाबराव  देशमुख कृषी विद्यापीठाने ज्वारीवर नवे संशोधन केले. नुकतेच  पारंपरिक ज्वारीपेक्षा दीडपट  उत्पादन देणारी एसपीव्ही-२३0७  ही ठोकळ दाण्याची जात विकसित केली असून, राष्ट्रीय स्तरावर  उपयुक्त असलेल्या या जातीच्या प्रसारणासाठी कृषी विद्यापीठाने  भारतीय कृषी संशोधन परिषदेकडे (आयसीएआर) शिफारस  केली आहे. 

ठळक मुद्देहेक्टरी ३८ क्विंटल उत्पादन

राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ज्वारी हे शाश्‍वत पीक आहे. यात सर्वाधिक  पोषणमूल्य सुरक्षा असल्याने अकोल्याच्या डॉ. पंजाबराव  देशमुख कृषी विद्यापीठाने ज्वारीवर नवे संशोधन केले. नुकतेच  पारंपरिक ज्वारीपेक्षा दीडपट  उत्पादन देणारी एसपीव्ही-२३0७  ही ठोकळ दाण्याची जात विकसित केली असून, राष्ट्रीय स्तरावर  उपयुक्त असलेल्या या जातीच्या प्रसारणासाठी कृषी विद्यापीठाने  भारतीय कृषी संशोधन परिषदेकडे (आयसीएआर) शिफारस  केली आहे. कृषी विद्यापीठाने आतापर्यंत ११ ज्वारीच्या जाती विकसित  केल्या आहेत. मागच्यावर्षी ‘कल्याणी’ ही जात प्रसारित केली  असून, ११५ दिवसांत परिपक्व होणार्‍या या ज्वारीचे हेक्टरी ४0  क्विंटल उत्पादन आहे. विशेष म्हणजे प्रथिनेयुक्त वैरणही  हेक्टरी  १४0 क्विंटल असल्याने ‘कल्याणी’ची मागणी यावर्षी वाढली  आहे. तसेच सीएसएच-३५  कृषी विद्यापीठाची ज्वारीची जात  याच वर्षी भारतीय कृषी संशोधन परिषदेने (नवी दिल्ली) राष्ट्रीय  स्तरावर प्रसारित केली. ‘हुरड्या’ची लज्जत वाढविणारी ‘ पीकेव्ही कार्तिकी’ ही नवी जात या कृषी विद्यापीठाने याचवर्षी  महाराष्ट्राला दिली. ८२ दिवसांत हुरडा देणार्‍या ‘कार्तिकी’चे उत् पादत तर हेक्टरी ४५ ते ४८ क्विंटल आहे. नव्याने दोन जाती  विकसित करू न राष्ट्रीय प्रसारणासाठी भारतीय कृषी संशोधन  परिषदेकडे पाठविण्यात आल्या आहेत. यामध्ये रब्बी हंगामासाठी  उपयुक्त एसपीएच-१८0१ जात असून, या ज्वारीचे उत्पादन ३५  ते ३८ क्विंटल आहे. वैरणाचे उत्पादनही १00 क्विंटल एवढे  आहे.

ज्वारीत   काय आहे?पोषणमूल्य सुरक्षा म्हणून, भारत आणि आफ्रिकेमध्ये उत्पादन घे तले जात असले, तरी ज्वारीमध्ये प्रथिने (काबरेहायड्रेड)  सर्वाधिक असून, खनिजाचे (मिनरल) प्रमाणही भरपूर आहे.  गहू, तांदळामुळे बद्धकोष्ठतेचे      प्रमाण अलीकडे वाढलेले  दिसते. ज्वारीत (फायबर) तंतूमय पदार्थ सर्वाधिक असल्याने  ज्वारी पचनासाठी उत्तम आहे. 

भाकरीसाठी सर्वाधिक उपयुक्त एसपीव्ही-२३0७ वेगळी जात या कृषी विद्यापीठाने विकसित  केली. विशेष म्हणजे ठोकळ दाणे असलेले हे सरळ वाण आहे.  ज्वारीचे उत्पादन हेक्टरी ३८ क्विंटल असून, पारंपरिक ज्वारी पेक्षा हे दीडपट आहे. या जातीपासून कडब्याचे उत्पादन १२५ ते  १४0 क्विंटल आहे. उत्पादन, चारा भरपूर व भाकरीची प्रत  उत्तम आहे. ही जात संपूर्ण देशासाठी प्रसारित करण्यासाठी कृषी  विद्यापीठाने आयसीएआरकडे शिफारस केली आहे.

इतर उत्पादनेज्वारीपासून बिस्कीट, लाडू, पापड, ढिरडे असे अनेक उपपदार्थ  बनविले जातात. या पदार्थांचीही मागणी वाढली आहे.

आतापर्यंत ११ ज्वारीच्या जाती विकसित केल्या असून, यावर्षी  एसपीव्ही-२३0७ व एसपीएच-१८0१ या दोन जाती विकसित  केल्या आहेत. देशासाठी उपयुक्त असलेल्या या दोन्ही जाती  प्रसारणासाठी आयसीएआरकडे पाठविण्यात आल्या आहेत.- रामेश्‍वर घोराडे, वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ,ज्वारी संशोधन विभाग, डॉ.पंदेकृवि, अकोला.

टॅग्स :agricultureशेती