शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

बढती नाकारणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची वेतनश्रेणी होणार रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 12:06 IST

बढती नाकारून संबंधित जागेवर रुजू होण्यास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांची वेतन श्रेणी रद्द करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने १९ डिसेंबर रोजीच्या परिपत्रकान्वये घेतला आहे.

वाशिम : राज्य परिवहन महामंडळाच्या प्रचलित सेवा विनियमानुसार कर्मचाऱ्यांसाठी खात्यांतर्गत बढती परीक्षेचे घेण्यात येते आणि उत्तीर्ण कर्मचाऱ्यांना बढती देऊन विविध ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात येते; परंतु संबंधित कर्मचारी बढतीनंतर बदलीच्या ठिकाणी जाण्यास इच्छूक नसतात. या पृष्ठभूमीवर बढती नाकारून संबंधित जागेवर रुजू होण्यास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांची वेतन श्रेणी रद्द करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने १९ डिसेंबर रोजीच्या परिपत्रकान्वये घेतला आहे.एसटीच्या वर्ग ३ व वर्ग ४ या प्रवर्गातील सर्वच कर्मचाºयांना बढतीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी संबंधित कर्मचाºयांची बढती परिक्षा घेण्यात येते. परिक्षा उर्त्तीण झाल्यानंतर त्यांना बढतीपदी नियुक्ती देण्यात येते; परंतु निवड श्रेणी, श्रेणीकरणाचा लाभ दिल्याने कर्मचारी बढतीच्या ठिकाणी जाण्यास उत्सूक नसतात, असे महामंडळाच्या निदर्शनास आले आहे, तसेच काही विशिष्ट प्रवर्गातील कर्मचाºयांना ठराविक सेवा कालावधी पूर्ण केल्यानंतर निवडश्रेणी दिली जाते. ज्यामध्ये लगतच्या वरिष्ठ पदाची वेतनश्रेणी देऊन वेतननिश्चिती केली जाते. निवडश्रेणी दिल्यानंतर त्या कर्मचाºयाची अन्यत्र बदली केली जात नाही. निवडश्रेणी, श्रेणीकरण मिळालेल्या कर्मचाºयासह अन्यत्र बदली न होता बढतीचे पद वगळता बढतीबाबतचे सर्व आर्थिक फायदे मिळतात. त्यामुळे बरेच कर्मचारी बढतीवर बदलीच्या ठिकाणी हजर होत नाहित. परिणामी महामंडळाच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे. या प्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी महामंडळाने जे कर्मचारी बढतीवर बदलीच्या ठिकाणी हजर होणार नाहीत, अशा कर्मचाºयांची पदग्रहण अवधी संपल्याच्या दुसºया दिवसापासून नियमित बढली रद्द करून त्यांच्या सध्याच्या लगतच्या पदात देण्यात आलेली निवड श्रेणी, श्रेणीकरण काढून घेण्यासह धारण केलेल्या पदावर वेतनश्रेणीत नव्याने वेतननिश्चिती करण्याचा निर्णय घेतला आहे.एसटी कामगार संघटनेचा विरोधएसटी महामंडळाने बढतीनंतर मिळणाºया पदावर बदलीने जाण्यास इच्छूक नसलेल्या एसटी कर्मचाºयांची वेतनश्रेणी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेकडून विरोध दर्शविण्यात आला आहे. एसटी कामगार करारातील तरतुदीचा भंग करणारा हा निर्णय असल्याचा युक्तीवाद महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेकडून करण्यात आला असून, हा निर्णय त्वरीत रद्द करण्याची मागणीही केली आहे. या संदर्भात संघटनेकडून एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना २१ डिसेंबर रोजी पत्रही पाठविण्यात आले आहे.

टॅग्स :washimवाशिमstate transportराज्य परीवहन महामंडळ