मान्सून परतीच्या मार्गावर; विदर्भाचे चित्र स्पष्ट होणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 00:02 IST2017-09-28T00:00:50+5:302017-09-28T00:02:28+5:30
अकोला : नैऋत्य मान्सून पंजाब आणि हरयाणा, पश्चिम राजस्थानातील काही भाग, कच्छ आणि उत्तर अरबी समुद्रातील काही भागांमधून परतीला निघाला आहे. यासंदर्भातील महाराष्ट्रातील चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे.

मान्सून परतीच्या मार्गावर; विदर्भाचे चित्र स्पष्ट होणार!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : नैऋत्य मान्सून पंजाब आणि हरयाणा, पश्चिम राजस्थानातील काही भाग, कच्छ आणि उत्तर अरबी समुद्रातील काही भागांमधून परतीला निघाला आहे. यासंदर्भातील महाराष्ट्रातील चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे.
येत्या दोन दिवसांत पाऊस परतीला निघण्यासाठीची हवामानाची स्थिती राजस्थानमध्ये निर्माण झाली होती, ती प्रत्यक्षात आल्याने परतीच्या पावसाचे वेध लागले आहेत. सामान्य मान्सून ३0 सप्टेंबरपर्यंत असतो; पण विदर्भातून तो १0 ऑक्टोबरपर्यंत परतीला निघण्याची शक्यता आहे. विदर्भात यावर्षी सरासरी २२ टक्के पावसाची तूट आहे.
२0 टक्के तूट ही सामान्य असल्याने येत्या ३0 सप्टेंबरपर्यंत पाऊस आल्यास ही तूट भरू न निघण्याची शक्यता आहे; परंतु सार्वत्रिक पावसाचे आता कोणतेही चिन्हं नसून, तुरळक एखाद्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भात पावसाळ्य़ात जो पाऊस झाला, त्याचे स्वरू प सार्वत्रिक नव्हतेच. त्यामुळे धरणांमध्ये अपेक्षित जलसाठा संचयित झाला नाही त्यामुळे आता परतीच्या पावसाकडे लक्ष लागले आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि पंजाब, हरयाणा, राजस्थान, गुजरात राज्य आणि उत्तर अरबी समुद्रातील काही भागांमधून पुढील ७२ तासांच्या काळात दक्षिण, पश्चिम भागातून मान्सून परतीला निघणार असल्याची अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.
परतीच्या पावसाची रेषा अमृतसर, हिसार, जोधपूर, नलिया, लाट येथून जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, यावर्षी पूरक पाऊस नसल्याने विदर्भातील भूगर्भातील जलसाठय़ात वाढ झाली नसून, धरणातही पूरक जलसाठा नाही. तसेच ३0 सप्टेंबरपर्यंत सार्वत्रिक दमदार पावसाचे कोणतेही संकेत नसल्याने यावर्षी धरणांतील र्मयादित साठय़ाचे काळजीपूर्वक नियोजन करणे गरजेचे आहे.
मान्सून परतीसाठीची परिस्थिती अनुकूल असून,पंजाब, हरयाणा तसेच पश्चिम राजस्थानमधून तो परतीला निघाला आहे. येत्या ७२ तासात देशातील आणखी काही भागातून परतीची स्थिती अनुकूल आहे. विदर्भातील परतीच्या पावसाचे चित्र लवकरच स्पष्ट होईल.
- ए. डी. ताठे, संचालक,
प्रादेशिक हवामान विज्ञान केंद्र,
भारतीय हवामानशास्त्र विभाग, नागपूर.