बँक खात्यातून पळवलेली तिघांची रक्कम परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:17 IST2021-02-05T06:17:14+5:302021-02-05T06:17:14+5:30
अकाेला : ऑनलाइन फसवणुकीच्या माध्यमातून बँक खात्यातून परस्पर रक्कम काढण्यात आल्याची तक्रार सायबर पोलिसांकडे केल्यानंतर या गुन्ह्याचा छडा लावून ...

बँक खात्यातून पळवलेली तिघांची रक्कम परत
अकाेला : ऑनलाइन फसवणुकीच्या माध्यमातून बँक खात्यातून परस्पर रक्कम काढण्यात आल्याची तक्रार सायबर पोलिसांकडे केल्यानंतर या गुन्ह्याचा छडा लावून पोलिसांनी ३७ हजार ३०० रुपयांची रक्कम तक्रारदारास परत करण्यात आली आहे. तर, कापशी येथील एकाची रक्कम पाेलिसांनी परत मिळवून दिली.
अंकुश गजानन गावंडे, रा. सांगवी खुर्द यांना ३० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास एका अनोळखी नंबरहून फोन आला की, त्यांना मोफतमध्ये बजाज फायनान्सचे क्रेडिटकार्ड मिळणार आहे. त्यासाठी त्यांना मोबाइलमध्ये क्विक सपोर्ट नावाचे ॲप्लिकेशन डाउनलोड करावे लागणार व त्यानंतर त्यांच्या अकाउंटमधून फायनान्सच्या अकाउंटमध्ये पाच रुपये टाकावे लागणार. अंकुश यांनी त्यांच्या म्हणण्यानुसार ॲप्लिकेशन डाउनलोड केले व बजाज फायनान्सच्या अकाउंटमध्ये पाच रुपये टाकले असता त्यांच्या अकाउंटमधून ३५ हजार रुपये रक्कम काढण्यात आली. दुसरी तक्रार विपुल पाठक (रा. डाबकी रोड) यांनी ६ जानेवारी रोजी केली होती. त्यांना एका अनोळखी नंबरहून फोन आला होता की, त्यांना पेटीएम या ऑनलाइन पोर्टलवर चार हजार रुपये कॅशबॅक आले आहे. त्याकरिता तुमच्या पेटीएम अकाउंटवर आलेल्या लिंकवर क्लिक करून तुमचा पासवर्ड टाका, असे सांगितले. पाठक यांनी तसे केल्यानंतर त्यांच्या अकाउंटमधून ३० हजार रुपये रक्कम काढण्यात आली होती. दोन्ही तक्रारीचा तपास करताना पोलिसांनी पेटीएम आणि बजाज फायनान्स याचा सखोल तपास केला असता रक्कम परत करण्यात पोलिसांना यश आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबरचे पोलीस निरीक्षक प्रशांत संदे, पीएसआय दीपक सोळंके, अतुल अजने, गोपाल ठोंबरे, आशीष आमले, राहुल देविकर यांनी केला.