केशरी, पिवळ्या शिधापत्रिका परत करा; अन्यथा कारवाई !
By Admin | Updated: June 11, 2017 14:08 IST2017-06-11T14:08:03+5:302017-06-11T14:08:03+5:30
कर्मचार्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी दिला.

केशरी, पिवळ्या शिधापत्रिका परत करा; अन्यथा कारवाई !
सरकारी कर्मचार्यांना इशारा
अकोला : सरकारी नोकरी असलेल्या अधिकारी -कर्मचार्यांनी त्यांच्याकडे असलेल्या केशरी किवा पिवळ्या शिधापत्रिका परत करुन शुभ्र शिधापत्रिका काढाव्या, अन्यथा संबंधित कर्मचार्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पुरवठा विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे यांच्यासह जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयांतर्गत अधिकारी उपस्थित होते.