सेवानिवृत्त शिपायाला जि.प. अध्यक्षांच्या कारमधून सोडले घरापर्यंत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 14:41 IST2019-06-01T14:38:01+5:302019-06-01T14:41:22+5:30

सेवानिवृत्त झालेले शिपाई लक्ष्मणराव देशमुख यांना जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी (सीईओ)अध्यक्षांच्या शासकीय वाहनात (कार) बसवून त्यांना घरापर्यंत सोडण्यात आले.

Retired employee's honour by ZP President and CEO by left him Car | सेवानिवृत्त शिपायाला जि.प. अध्यक्षांच्या कारमधून सोडले घरापर्यंत!

सेवानिवृत्त शिपायाला जि.प. अध्यक्षांच्या कारमधून सोडले घरापर्यंत!

ठळक मुद्देजिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांनी आपल्या दालनात लक्ष्मणराव देशमुख यांचा सत्कार केला.लक्ष्मणराव देशमुख यांना शासकीय कारमध्ये बसवून जिल्हा परिषद परिसरात फिरविले. त्यानंतर अध्यक्षांच्या शासकीय कारमधून त्यांना घरापर्यंत सोडण्यात आले.

अकोला : जिल्हा परिषद अध्यक्ष कार्यालयातील सेवानिवृत्त झालेले शिपाई लक्ष्मणराव देशमुख यांना ३१ मे रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी (सीईओ)अध्यक्षांच्या शासकीय वाहनात (कार) बसवून त्यांना घरापर्यंत सोडण्यात आले.
जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांनी आपल्या दालनात लक्ष्मणराव देशमुख यांचा सत्कार केला. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपाध्यक्ष जमीरउल्लाखा पठाण, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मा. मा. मानमोठे, कार्यकारी अभियंता सोनवणे, हरिभाऊ वाघोडे, राजू मालगे व विकास सदांशिव उपस्थित होते. यांनतर जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे व मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी लक्ष्मणराव देशमुख यांना जिल्हा परिषद अध्यक्षाच्या शासकीय कारमध्ये बसवून जिल्हा परिषद परिसरात फिरविले. त्यानंतर अध्यक्षांच्या शासकीय कारमधून त्यांना घरापर्यंत सोडण्यात आले.
 

 

Web Title: Retired employee's honour by ZP President and CEO by left him Car