फवारणीनंतर डोळ्यांवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 01:39 IST2017-10-11T01:39:11+5:302017-10-11T01:39:14+5:30

माझोड : कीटकनाशक फवारणी झाल्यानंतर डोळ्यांवर परिणाम झाल्याचा प्रकार माझोड येथे घडला आहे.

Results on the eyes after spraying | फवारणीनंतर डोळ्यांवर परिणाम

फवारणीनंतर डोळ्यांवर परिणाम

ठळक मुद्देमाझोड येथील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क
माझोड : कीटकनाशक फवारणी झाल्यानंतर डोळ्यांवर परिणाम झाल्याचा प्रकार माझोड येथे घडला आहे.
कीटकनाशक फवारणी केल्यानंतर शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा होऊन अनेक नागरिकांचे बळी गेल्याचा प्रकार उजेडात आला असतानाच माझोड येथील प्रगतशिल शेतकरी संतोष समाधान ताले यांच्या डोळ्यावर परिणाम झाल्याचा प्रकार उघडकीस आला. 
संतोष ताले पाटील यांनी आपल्या शेतातील वांग्यावर कीटकनाशकाची फवारणी केली. घरी आल्यानंतर अचानक त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊन त्रास होऊ लागलो. त्यांनी त्वरित अकोला गाठून खासगी नेत्रतज्ज्ञांकडे तपासणी केली असता, डॉक्टरांनी कीटकनाशकाची फवारणी केल्यामुळे डोळ्यांवर परिणाम झाल्याचे सांगितले. 
काही दिवसांपूर्वी गोरेगाव येथील शेतकर्‍यांचा याच प्रकाराने मृत्यू झाला आहे.

Web Title: Results on the eyes after spraying