अकोला जिल्ह्यात युवक काँग्रेसच्या ‘चलो पंचायत’ अभियानाला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 15:30 IST2019-01-30T15:30:20+5:302019-01-30T15:30:46+5:30

अकोला: अकोला जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसतर्फे १ जानेवारीपासून जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश गणगणे यांच्या नेतृत्वात राबविण्यात येत असलेल्या ‘चलो पंचायत’ या अभियानास प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

Response to Youth Congress's Chalo Panchayat campaign in Akola district | अकोला जिल्ह्यात युवक काँग्रेसच्या ‘चलो पंचायत’ अभियानाला प्रतिसाद

अकोला जिल्ह्यात युवक काँग्रेसच्या ‘चलो पंचायत’ अभियानाला प्रतिसाद

अकोला: अकोला जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसतर्फे १ जानेवारीपासून जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश गणगणे यांच्या नेतृत्वात राबविण्यात येत असलेल्या ‘चलो पंचायत’ या अभियानास प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
हे अभियान बेरोजगार युवक व कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी असून, यादरम्यान बेरोजगारांना ‘युवा शक्ती कार्ड’ व शेतकºयांना ‘किसान शक्ती कार्ड’ देऊन त्यांची नोंदणी करण्यात येत आहे. या अभियानात विविध गावांमध्ये सभा घेऊन ग्रामस्थांना काँग्रेसच्या ध्येय-धोरणांबद्दल माहिती देण्यात आली, तसेच विविध गावांमध्ये युवक काँग्रेसच्या शाखांचे उद्घाटन करण्यात आले. या अभियानाकरिता विशेष रथ तयार करण्यात आला असून, अकोट व तेल्हारा तालुक्यातील विविध गावांमध्ये तो रथ फिरविण्यात येत आहे. अकोट तालुक्यातील मुंडगाव, अकोली जहागीर, पणज, वडाळी देशमुख, चंडिकापूर, शहापूर, मंचनपूर, अकोलखेड, तर तेल्हारा तालुक्यातील दहीगाव, रायखेड, कोठा, बेलखेड, हिवरखेड, वारखेड, अडगाव आदी गावांमध्ये हे अभियान राबविण्यात आले. ३१ जानेवारीपर्यंत हे अभियान सुरू राहणार आहे. अभियानासाठी अक्षय गणोरकर, मयूर निमकर, केशव हेंड, विवेक धर्मे, प्रकाश मंगवाणी, अ. कलीम, सनी चौधरी, प्रतीक गोरे, विशाल राठोड, राहुल थोटांगे, विशाल इंगळे, रितेश साबळे, उमेश टापरे, स्वप्निल राऊत व मनीष भुडके यांचे सहकार्य लाभत आहे.

 

Web Title: Response to Youth Congress's Chalo Panchayat campaign in Akola district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.