शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
4
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
5
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
6
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
7
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
8
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
9
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
10
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
11
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
12
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
13
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
14
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
15
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
16
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
17
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
18
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
19
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
20
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

गैरहजर सात ‘बीडीओं’वर कारवाईचा ठराव

By admin | Updated: May 7, 2015 01:32 IST

अकोला जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा; ठराव शासनाकडे पाठविणार.

अकोला : जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेला गैरहजर राहिलेल्या जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकार्‍यांवर (बीडीओ) शिस्तभंगाची कारवाई करण्याचा ठराव बुधवारी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला. याबाबतचा ठराव शासनाकडे पाठविण्याचेही सभेत ठरविण्यात आले.जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेला अकोला, आकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी गैरहजर होते. यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी, पुंडलिक अरबट, विजय लव्हाळे, रामदास लांडे व इतर सदस्यांनी आक्षेप घेत तीव्र नाराजी व्यक्त केली. या मुद्यावर आक्रमक झालेल्या सदस्यांनी सभेचे सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद इनामदार यांना विचारणा केली असता, जिल्हा परिषदेच्या कोणत्याही सभेला हजर राहणार नसल्याबाबत गटविकास अधिकार्‍यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना पत्र दिल्याची माहिती देण्यात आली. त्यावर संताप व्यक्त करीत सभेला गैरहजर राहणार्‍या जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार सातही गटविकास अधिकार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला. हा ठराव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांमार्फत शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयासह विभागीय आयुक्त आणि ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे पाठविण्याचेही सभेत ठरविण्यात आले. *डीओंना सीईओ पाठीशी घालत असल्याचा आरोप!जिल्हा परिषदेच्या कोणत्याही सभेला उपस्थित राहणार नसल्याबाबत पत्र देणार्‍या गटविकास अधिकार्‍यांना (बीडीओ) मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पाठीशी घालत असल्याचा आरोप या सभेत सदस्यांनी केला.