ग्रामपंचायत माळेगाव बाजार येथे प्रजासत्ताक दिन
माळेगाव बाजार : येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजाराेहण करण्यात आले. या वेळी ग्रामपंचायत सरपंच संजय बगाडे यांनी महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन केले. उपकेंद्रात ग्रामपंचायत सदस्य प्रमोद विनायक वानेरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जि. प. शाळा माळेगाव येथे शाळेच्या वरिष्ठ शिक्षिका यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, ग्रामसेवक उंबरकार, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष उपस्थित होते.
दानापूर येथे जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिन
दानापूर : जि. प. शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्याध्यापक विश्वेश्वर पातुर्डे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महादेव वानखडे, उपाध्यक्ष सुकेशनी वाकोडे, जिल्हा परिषद सदस्य दीपमाला दामधर, पंचायत समिती सदस्य संदीप पालीवाल व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य गोपाल विखे, सपना वाकोडे, गणेश सांगून वेढे, रवींद्र तायडे, योगेश येऊल, सागर ढगे, रूपाली घायल, हागे ताई, वासुदेव खवले, गोपाल माकोडे व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सौ. खोडे यांनी केले तसेच आभार डाबेराव यांनी मानले. जिल्हा परिषद कन्या शाळा येथे मुख्याध्यापक सौ. कळंबे यांनी ध्वजारोहण केले. त्या वेळी शाखा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय हागे, उपाध्यक्ष व सर्व शाळा समिती सदस्य व शिक्षक शिक्षिका हजर होत्या. प्राथमिक आरोग्य केंद्र दानापूर येथील ध्वजारोहण जि. प. सदस्य दीपमाला दामधर यांच्या हस्ते करण्यात आले. जनता विद्यालय येथे शाळेचे अध्यक्ष वसंतराव चवडकार यांनी ध्वजारोहण केले. या वेळी मुख्याध्यापक डाबरे उपस्थित होते. नारायणी देवी शहा येथील ध्वजारोहण राधेश्याम शहा यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रा. रवींद्र घायल उपस्थित होते. ग्रामपंचायत येथील ध्वजारोहण ग्रा. विकास अधिकारी भीमराव गरकल यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक व पोलीस पाटील माकोडे व ग्रापंचायतीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा परिषद उर्दू शाळेचे ध्वजारोहण मुख्याध्यापक शारिख परवेश यांनी केले.