युवकाच्या हत्या प्रकरणावर बुधवारी न्यायालयात पुन्हा सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 13:30 IST2019-03-09T13:30:17+5:302019-03-09T13:30:24+5:30
अकोला: अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पत्नीने सासू आणि प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केली. या प्रकरणात न्यायालयात खटला असून, शुक्रवारी सरकारी पक्षाने बाजू मांडण्यासाठी वेळ मागितला असल्याने न्यायालयाने सुनावणी १३ मार्चपर्यंत पुढे ढकलली आहे.

युवकाच्या हत्या प्रकरणावर बुधवारी न्यायालयात पुन्हा सुनावणी
अकोला: अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पत्नीने सासू आणि प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केली. या प्रकरणात न्यायालयात खटला असून, शुक्रवारी सरकारी पक्षाने बाजू मांडण्यासाठी वेळ मागितला असल्याने न्यायालयाने सुनावणी १३ मार्चपर्यंत पुढे ढकलली आहे.
अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या सचिन नाजूकराव भटकर याची पत्नी सारिका हिने तिचा प्रियकर विजय काशीराम नरवाडे आणि सासू चंदा नाजूकराव भटकर या तिघांनी १५ मार्च २०१५ रोजी रात्री १२ वाजताच्या दरम्यान हत्या केली होती आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्नही केला होता. मृतकाचा भाऊ शरद भटकर यांच्या तक्रारीनुसार सिव्हिल लाइन पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ३०२, १२० ब, २०१, ४९७, ३४ नुसार गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणाची सुनावणी तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. केदार यांच्या न्यायालयात सुरू आहे. सरकारी पक्षाने नऊ जणांच्या साक्ष नोंदविल्या, तर आरोपींकडून साक्षीदारांची उलट तपासणी करण्यात आली. शुक्रवारी न्यायालयात आरोपीच्या विधिज्ञांनी युक्तिवाद केला. या युक्तिवादावर सरकारी पक्षाने बाजू मांडण्यासाठी न्यायालयाकडे पुढील तारीख मागितली. न्यायालयाने ही मागणी मान्य करीत १३ मार्चपर्यंत सुनावणी पुढे ढकलली. (प्रतिनिधी)