व्याज सवलत योजनेतील त्रुटी दूर करा

By Admin | Updated: June 30, 2014 01:53 IST2014-06-30T00:50:00+5:302014-06-30T01:53:21+5:30

अकोला जिल्हा काँग्रेसचे सहकार मंत्र्यांना निवेदन.

Remove the errors in the interest concession plan | व्याज सवलत योजनेतील त्रुटी दूर करा

व्याज सवलत योजनेतील त्रुटी दूर करा

अकोला : पीक कर्जावरील व्याज सवलत योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी जिल्हा काँग्रेसच्यावतीने सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शेतकर्‍यांना एक लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज बिनव्याजी देण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे.यासाठी शासनाच्यावतीने काही मार्गदर्शक तत्वेही आखून देण्यात आली आहेत. या धोरणानुसार पीक कर्जाची विहित मुदतीत परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांच्या पीक कर्जावरील व्याज डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनें तर्गत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना ३ टक्के आणि व्यापारी बँकांना ४ टक्के व्याजाची परतफेड केली जाते. यासोबतच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना नाबार्डच्या माध्यमातून केंद्र सरकारतर्फे ३ टक्के व्याजाची परतफेड केली जाते. या पृष्ठभूमीवर जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकांकडून शेतकर्‍यांना १ लाखापर्यंचे पीक कर्ज व्याजमुक्त दिले जाते. राष्ट्रीयीकृत बँकामार्फत शेतकर्‍यांना १ लाखापर्यंत पीक कर्ज दिले जाते; मात्र कर्ज वसुलीच्यावेळी ७ टक्के व्याजाची आकारणी केली जा ते. ७ टक्क्यापैकी ३ टक्के व्याजाची रक्कम डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत मिळाल्यानंतर शेतकर्‍यांना परत केली जाते.
राष्ट्रीयीकृत बँकांकडून पीककर्ज घेणार्‍या शेतकर्‍यांना केंद्र सरकारच्या व्याज सवलत योजनेचा लाभ मिळत नाही. अकोला जिल्हय़ात अनेक शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना बिनव्याजी पीक कर्ज मिळावे, यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांनादेखील नाबार्डमार्फत केंद्र सरकारच्या व्याज सवलत योजनेचा लाभ देण्यात यावा. त्यासाठी व्याज सवलत योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणीही अकोला जिल्हा काँग्रेसच्यावतीने सहकार मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Web Title: Remove the errors in the interest concession plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.