रिलायन्स, वोडाफोनला खोदकाम बंद करण्याचे निर्देश

By Admin | Updated: August 22, 2014 00:26 IST2014-08-22T00:08:17+5:302014-08-22T00:26:14+5:30

नगरसेवकांचा गदारोळ; प्रस्तावाला महापौरांची मंजुरी

Reliance, Vodafone to close the engraving | रिलायन्स, वोडाफोनला खोदकाम बंद करण्याचे निर्देश

रिलायन्स, वोडाफोनला खोदकाम बंद करण्याचे निर्देश

अकोला : शहरात फोर-जी सुविधा पुरविण्याच्या नावाखाली जलवाहिन्यांची तोडफोड करून ती दुरुस्त न करणार्‍या रिलायन्ससह वोडाफोन कंपनी खोदकाम बंद करण्याचे निर्देश महापौर ज्योत्स्ना गवई यांनी दिले. यासोबतच मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यासाठी ह्यजीआयएसह्ण प्रणालीला महापालिका सभागृहाने गुरुवारी एकमताने मंजुरी दिली. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आयोजित या सभेत २२ विषय मांडले होते. सुरुवातीला फोर-जीसाठी खोदकामाच्या नावाखाली मोबाईल कंपन्या मनमानी करीत असल्याचा आरोप करीत भारिप-बमसं, भाजप व शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभागृह अक्षरश: डोक्यावर घेतले. कंपनीकडून खोदकाम होत असताना सिमेंट काँक्रीट रस्त्यासह जलवाहिन्यांची प्रचंड तोडफोड होत असून, दुरुस्तीसाठी मात्र कंपनीचे प्रतिनिधी टाळाटाळ करीत असल्याचा मुद्दा उपस्थित झाला. फोर-जीसाठी नेमक्या किती कंपन्यांसोबत करार केला, याचा खुलासा करण्याची मागणी नगरसेवक बाळ टाले, अजय शर्मा, पंकज गावंडे, सतीश ढगे, आशिष पवित्रकार, रामा तायडे, राहुल देशमुख, विनोद मापारी यांनी केली. जोपर्यंंत कंपनी जलवाहिन्या दुरुस्त करीत नाही, तोपर्यंंत काम बंद ठेवण्याची विनंती बाळ टाले यांनी केली. भारिपचे गटनेता गजानन गवई यांनी फोर-जीच्या कराराबद्दल सर्वपक्षीय नगरसेवक अनभिज्ञ असल्याचे स्पष्ट करीत कंपनीच्या खोदकामामुळे शहराचे प्रचंड नुकसान होत असल्याचे नमूद केले. नगरसेवकांच्या आक्षेपावर प्रशासन खुलासा करण्याची तसदी घेत नसल्याचे पाहून फोर-जीचे खोदकाम बंद करण्याचे निर्देश महापौर ज्योत्स्ना गवई यांनी दिले. यादरम्यान, शहरातील मालमत्तांच्या पुनर्मूल्यांकनासाठी जीआयएस (जीओग्राफिकल इन्फॉरमेशन सिस्टीम) प्रणालीद्वारे सर्वेक्षण करणे आदींसह महत्त्वपूर्ण १९ विषयांना महापौरांनी मंजुरी दिली.

Web Title: Reliance, Vodafone to close the engraving

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.