रिलायन्सच्या वाहनांची तोडफोड!

By Admin | Updated: August 21, 2014 00:43 IST2014-08-20T22:29:46+5:302014-08-21T00:43:18+5:30

जलवाहिनी तोडणे भोवले

Reliance vehicles break! | रिलायन्सच्या वाहनांची तोडफोड!

रिलायन्सच्या वाहनांची तोडफोड!

अकोला : वारंवार सूचना देऊनही तोडलेल्या जलवाहिन्या दुरुस्त करण्यासाठी टाळाटाळ करणार्‍या रिलायन्स कंपनीच्या मुजोर कर्मचार्‍यांना गोरक्षण रोडवरील नागरिकांनी चांगलाच धडा शिकवला. उपस्थित कर्मचार्‍यांना सळो की पळो करून सोडत कंपनीच्या वाहनांची प्रचंड तोडफोड व नासधूस केल्याची घटना बुधवारी रात्री गोरक्षण रोडवरील व्हीएचबी कॉलनीत घडली.
शहराच्या विविध भागात फोर-जी सुविधेसाठी खोदकाम करून फायबर ऑप्टीक केबलचे जाळे पसरविण्याचे काम रिलायन्स कंपनीच्यावतीने सुरू आहे. खोदकाम करताना विविध ठिकाणी जलवाहिन्या व दूरसंचार विभागाच्या केबल्स तोडल्या जात आहेत. जलवाहिन्या दुरुस्त करून देण्याची जबाबदारी कंपनीवर असतानासुद्धा कंपनी अकोलेकरांना ठेंगा दाखवत आहे. असाच प्रकार गोरक्षण रोडवरील व्हीएचबी क ॉलनीत घडला. शहरात पाण्याचे दुर्भिक्ष असून कंपनीने तोडलेल्या ३०० व्यासाच्या जलवाहिनीतून पाण्याचे अक्षरश: लोट वाहत असल्यामुळे संतप्त नागरिकांनी कंपनीच्या उपस्थित कर्मचार्‍यांना हटकले. मुजोर कर्मचार्‍यांनी अरेरावीपणा केल्यामुळे नागरिकांनी रिलायन्सच्या वाहनांवर हल्लाबोल करीत प्रचंड नासधूस केली.

** मनपाचा अभियंता आहे कोठे?
कंपनीच्यावतीने ज्या-ज्या भागात खोदकाम केले जाईल, त्यावर देखरेख ठेवण्यासाठी मनपाने बांधकाम विभागातील अभियंत्यांची नेमणूक करणे बंधनकारक आहे. कंपनीच्या कामकाजावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असताना मनपाचा एकही अभियंता हजर राहत नसल्याची माहिती आहे. यामुळे शहरात खोदकाम करताना कंपनी बेलगाम झाल्याचे चित्र समोर येत आहे.

 ** व्होडाफोन अवतरला कसा?
संतापलेल्या नागरिकांनी रिलायन्स नव्हे तर व्होडाफोन कंपनीच्या वाहनांची तोडफोड केल्याचे समोर आले. या ठिकाणी खोदकाम करणारी कंपनी व्होडाफोन असल्याचे मनपा अधिकार्‍यांनी स्पष्ट करताच, व्होडाफोन कंपनीसोबत कधी व कोणता करार झाला, यावर शंका-कुशंकांना ऊत आला. ५० लाखांमध्ये व्होडाफोन कंपनीसोबत करार झाल्याची माहिती आहे.
 

Web Title: Reliance vehicles break!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.