शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
4
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
5
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
6
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
7
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
8
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
9
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
10
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
11
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
12
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
13
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
14
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
15
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
16
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
17
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
18
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
19
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
20
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये पहिली ‘विकेट’ अकोल्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 13:52 IST

पक्ष विरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत प्रदेश सचिव प्रशांत गावंडे सहा वर्षासाठी निलंबित

अकोला : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमधील पक्ष विरोधी कारवाई करणाऱ्यांवर प्रदेश स्तरावरून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. त्यात पहिली विकेट अकोल्यातून गेली आहे. प्रदेश सचिव प्रशांत गावंडे यांना सहा वर्षासाठी निलंबित करण्याचे आदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत.

अकोला लोकसभा मतदासंघात महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांना ४ लाख १६ हजार ४०४ मते मिळूनही महायुतीतील भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या कडून ४० हजार ६२६ मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवासाठी काँग्रेस पक्षातीलच काही पदाधिकारी जबाबदार असल्याचा आरोप डॉ. अभय पाटील यांनी करून मुंबईतील बैठकीदरम्यान प्रदेश काँग्रेस कमिटीकडे तक्रार केली होती.

त्याची गांभिर्याने दखल घेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रदेश कार्यकारिणीत सचिव पदावर कार्यरत असलेले प्रशांत गावंडे यांच्यावर पक्ष विरोधी कारवाईचा ठपका ठेवत सहा वर्षासाठी निलंबनाची कारवाई केली आहे. याबाबतचा आदेश बुधवार, १२ जून रोजी प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे (प्रशासन व संघटन) यांनी काढला आहे.

आणखी काही नेते रडारवरअकोला काँग्रेसमध्ये सर्वकाही आलबेल नाही. संघटनात्मक स्तरावर अनेक मतभेद असून, त्याचे पडसाद लोकसभा निडवडणुकीदरम्यान उमटले होते. त्यामुळे एकसंघ काँग्रेस असल्याचे भासवित काँग्रेस उमदेवराच्या विरोधात काम करणारे आणखी काही नेते पक्षाच्या रडारवर असल्याचे बोलल्या जात आहे. त्याबाबत प्रदेश स्तरावरून चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आणखी किती नेत्यांच्या विकेट जाणार याकडे पक्ष कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

मला पक्षाने कोणतीही नोटीस दिली नाही. माझ्यावर पक्षविरोधी कारवाईचा आरोप करण्यात आला आहे. त्याचे पुरावे पक्षाने द्यावे. नैसर्गिक न्याय हक्कानुसार मला माझी बाजू मांडण्याची संधी द्यायला हवी. ते देऊ शकत नसेल तर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना नियमानुसार पक्ष कसा चालवायाचा हे समजून सांगितले पाहिजे.- प्रशांत गावंडे, प्रदेश सचिव, काँग्रेस

टॅग्स :Akolaअकोलाcongressकाँग्रेस