अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रतिबिंब मराठी साहित्यात
By Admin | Updated: February 14, 2015 01:21 IST2015-02-14T01:21:01+5:302015-02-14T01:21:01+5:30
अकोला येथील ग्रंथोत्सव-२0१५ परिसंवादातात उमटला मान्यवरांचा सूर.

अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रतिबिंब मराठी साहित्यात
अकोला : देशात प्रत्येक प्रांतात अंधश्रद्धेला मोठय़ा प्रमाणात महत्त्व दिलं जातं. भाबड्या कल्पनेमागे धावण्याची सवय लोकांना लागली आहे. पुरातन काळापासून चालत आलेल्या चाली-रीती आणि रुढी-परंपरांना चिकटलेल्या या लोकांना दूर सारण्यासाठी संत महात्म्यांनी आपल्या साहित्यात अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम केले आहे. सत्यशोधक, दलित, स्त्रीवादी, अभिजनवादी अशा विविध प्रकारांनी नटलेले मराठी साहित्यात अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रतिबिंब उमटले असल्याचा सूर शुक्रवार, १३ फेब्रुवारी रोजी ग्रंथोत्सवात पार पडलेल्या परिसंवादात उमटला.
ग्रंथोत्सव-२0१५ निमित्त श्री शिवाजी महाविद्यालयाच्या वसंत सभागृहात ह्यमराठी साहित्यात अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रतिबिंब उमटले आहे का?ह्ण या विषयावर आयोजित परिसंवादात वध्र्याच्या प्रा. नूतन माळवी, अकोल्याचे डॉ. गोपाल उपाध्ये व प्रा. संजय पोहरे सहभागी झाले होते. ह्यमाटिका इक नाग बनाके; पुजे लोग लुगाया, जिंदा बाप कोई न पूजे, मरे बाप पुजवाया.ह्ण कबिराच्या दोहय़ाने प्रा. नूतन माळवी यांनी परिसंवादाला सुरुवात केली. संतपरंपरेत संत नामदेव, तुकाराम महाराज यांनी रचलेल्या साहित्याची उकल करीत तुकडोजी महाराज, गाडगेबाबा, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे, बहिणाबाई आदींनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी विज्ञानवादी दृष्टिकोनातून त्यांच्या साहित्यात मांडलेले विचार अंगीकारण्याची गरज असल्याचे मत प्रकट केले.