अकोल्यात १००० किलो पोहे बनविण्याचा विक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 15:31 IST2018-12-30T15:30:28+5:302018-12-30T15:31:09+5:30
अकोला: मोर्णा महोत्सवा अंतर्गत २९ डिसेंबर रोजी सकाळी तब्बल १००० किलो बनविण्याचा विक्रम नीरज आवंडेकर यांनी केला.

अकोल्यात १००० किलो पोहे बनविण्याचा विक्रम
अकोला: मोर्णा महोत्सवा अंतर्गत २९ डिसेंबर रोजी सकाळी तब्बल १००० किलो बनविण्याचा विक्रम नीरज आवंडेकर यांनी केला. या कार्यक्रमासाठी अकोल्याचे पालकमंत्री ना.डॉ. रणजित पाटील हे आर्वर्जुन उपस्थित होते. पोहे तयार करण्यासाठी दहा फूट बाय दहा फुटाची भव्य कढई सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी उपलब्ध करून दिली होती. आवंडेकर व त्यांची चमूने गत १५ दिवसांपासून या संदर्भात तयारी केली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात पोहे बनविण्याचा विक्रमच असल्याचा दावा आयोजकांनी माध्यमांशी बोलताना केला.