शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
2
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
3
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
4
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
5
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
6
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
7
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
8
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
9
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
10
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
11
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
12
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
13
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
14
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
15
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
16
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
17
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
18
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

नेरधामणा प्रकल्पाला ‘सुप्रमा’ देण्याची शिफारस  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 02:09 IST

अकोला : राज्यातील पथदर्शक प्रकल्प म्हणून अकोला जिल्ह्यातील खारपाणपट्टय़ात होत असलेल्या नेरधामणा बॅरेजकडे बघितले जाते. या बॅरेजचे काम पूर्ण झाल्यास हा भाग सुजलाम सुफलाम होईल; पण गत चार वर्षांपासून बॅरेजचे काम बंद आहे.

ठळक मुद्दे सचिवांच्या त्रिसदस्यीय समितीने केली शिफारस पालकमंत्र्यांनी घेतला पुढाकार 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यातील पथदर्शक प्रकल्प म्हणून अकोला जिल्ह्यातील खारपाणपट्टय़ात होत असलेल्या नेरधामणा बॅरेजकडे बघितले जाते. या बॅरेजचे काम पूर्ण झाल्यास हा भाग सुजलाम सुफलाम होईल; पण गत चार वर्षांपासून बॅरेजचे काम बंद आहे. म्हणूनच शासनाने याचा अभ्यास करण्यासाठी सनदी अधिकार्‍यांची त्रिसदस्य समिती गठीत केली होती. अभ्यासाअंती या समितीने बुधवारी सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठीची (सुप्रमा) शासनाकडे शिफारस केल्याने बॅरेजच्या उर्वरित बांधकामाचा मार्ग मोकळा झाल्याचे वृत्त आहे.खारपाणपट्टय़ातील शेतकर्‍यांना गोड पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी पूर्णा खोर्‍यातील काळय़ा मातीवर हे पहिले बॅरेज होत असून, त्यासाठी आधुनिक डॉयफाम वॉल प्रणाली वापरण्यात आली. या बॅरेजची मूळ किंमत १८५ कोटी होती. तथापि, वेळेत काम पूर्ण न झाल्याने आजमितीस ही किंमत ९५0 कोटी रुपयांपर्यंत गेली आहे.  बॅरेजचे ८0 टक्के काम पूर्ण झाले. २0१७ मध्ये बॅरेजचे बांधकाम पूर्ण होणार होते; पण अद्याप वक्रद्वार लावण्यात आले नाहीत, त्यामुळे बॅरेजमध्ये पाणी अडवता आले नाही.दरम्यान, २00६-0७ पासून येथे बॅरेजचा प्रस्ताव होता. तथापि, मंजुरीच मिळाली नव्हती. ‘लोकमत’ने या बाबतीत सातत्याने वृत्त प्रकाशित करू न पाठपुरावा केल्यांनतर २00९ -१0 मध्ये प्रत्यक्ष बॅरेजच्या कामाला सुरुवात झाली होती.  प्रशासकीय मान्यतेनुसार ६३८ कोटी रुपये मंजूर झाले होते, त्यानुसार २0१२ पर्यंत बॅरेजचे बांधकाम करण्यात आले असून, ८0 टक्के काम जवळपास पूर्ण झाले. तथापि, साहित्याचे दर वाढत गेल्याने बॅरेजची किंमत ९५0 कोटी रुपयांवर पोहोचली. उर्वरित कामासाठी आणखी ३00 कोटी रुपयांची गरज आहे.या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी शासनाने वित्त, नियोजन व जलसंपदा या मंत्रालयीन सचिवस्तरीय सनदी अधिकार्‍यांची त्रीसदस्यीय समिती नेमली होती. समितीने सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यासंबंधीचा सकारात्मक अहवाल शासनाला दिला असून, त्यामुळे बॅरेजच्या पुढील कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

भूमिगत पाणी वितरणाचे काय?बॅरेजच्या उर्वरित बांधकामाला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली असली, तरी भूमिगत पाणी वितरण प्रणालीचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शासनाने भूमिगत वितरण प्रणाली अनिवार्य केली आहे; परंतु अद्याप यावर कोणताच निर्णय झाला नाही. म्हणजे बॅरेज होईल आणि शेतकर्‍यांना पाणीच जर मिळणार नसेल, तर बांधकामाचा अर्थ काय, असे प्रश्नही उपस्थित होत आहेत.

सचिवांच्या समितीने सुप्रमासाठी शासनाकडे शिफारस केल्यामुळे नेरधामणा बॅरेजचे रखडलेले काम लवकरच पूर्ण होऊन, खारपाणपट्टय़ातील शेतकरी, नागरिकांना पाणी उपलब्ध होईल. ही शिफारस आता मंत्रीमंडळाच्या बैठकीत ठेवण्यात येणार आहे.  शासन शेतकरी,जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, जिल्हय़ाच्या विकासाला प्राधान्य देण्यात येत आहे.- डॉ. रणजित पाटील, पालकमंत्री,अकोला.

टॅग्स :DamधरणWaterपाणी