भरतीसाठी नकार देणा-या आरोग्य कर्मचा-यांना समज!
By Admin | Updated: October 27, 2016 03:40 IST2016-10-27T03:40:02+5:302016-10-27T03:40:02+5:30
गर्भवती महिलेस सर्वोपचार रुग्णालयात भरती करून घेण्यास दिला होता नकार.

भरतीसाठी नकार देणा-या आरोग्य कर्मचा-यांना समज!
अकोला, दि. २६-वाशिम बायपासवर राहणार्या सपना खंडेराव या गर्भवती महिलेस सर्वोपचार रुग्णालयात भरती करून घेण्यास नकार दिल्याने अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी आरोग्य कर्मचारी व परिचारिकांना बुधवारी दुपारी समज देण्यात आली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कॉलेज कौन्सिलची बैठक बुधवारी दुपारी ४ वाजता पार पडली. या बैठकीमध्ये सोमवारी उशिरा रात्री प्रसू तीसाठी भरती होण्यास आलेल्या सपना खंडेराव या गर्भवती महिलेला प्रसूतिशास्त्र विभागातील आरोग्य कर्मचारी व परिचारिकांना नकार दिला आणि गर्भवती महिलेस जिल्हा स्त्री रुग्णालयाचा रस्ता दाखविला. या प्रकरणाची अधिष्ठाता डॉ. कार्यकर्ते यांनी दखल घेतली आणि बुधवारी दुपारी कॉलेज कौन्सिलच्या बैठकीमध्ये संबंधित आरोग्य कर्मचारी व परिचारिकांना बोलावून समज दिली. घडलेला प्रकार गंभीर असून, यापुढे रुग्णांना भरती करून घेण्यास नकार दिल्यास, संबंधित डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचार्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा अधिष्ठाता डॉ. कार्यकर्ते यांनी दिला.