रेडीमेड कापड व्यावसायिकांचे प्रकाश आंबेडकर यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 06:28 PM2021-02-27T18:28:12+5:302021-02-27T18:28:23+5:30

Prakash Ambedkar News रेडीमेड कापड दुकानेही उघडण्याची परवानगी मिळवून देण्यात यावी अशी विनंती केली.

Readymade garments traders of Akoal Meet Prakash Ambedkar | रेडीमेड कापड व्यावसायिकांचे प्रकाश आंबेडकर यांना साकडे

रेडीमेड कापड व्यावसायिकांचे प्रकाश आंबेडकर यांना साकडे

Next

अकोला : अकोला शहरामध्ये लॉकडाउन चा कालावधी वाढवुन ८ मार्च केलेला आहे. लॉकडाऊनमध्ये दुकानांना जिवनावश्यक वस्तुंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. तथापी, काही वस्तू जीवनावश्यक नसतानाही, त्यांना मुभा देण्यात आली आहे. या पृष्ठभूमीवर अकोला शहरातील रेडीमेड कापड व्यावसायिकांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेउन जिल्हा प्रशासनाकडून रेडीमेड कापड दुकानेही उघडण्याची परवानगी मिळवून देण्यात यावी अशी विनंती केली.  यावेळी ॲड. आंबेडकर यांनी लवकरच शासनासोबत बोलून हा प्रश्न मार्गी लावुन सरसकट सर्वच दुकाने उघडण्याची व्यवस्था करु असे आश्वस्त केले. आम्ही कोविड संदर्भातील सर्व नियम पाळु, अशी ग्वाही सुद्धा यावेळी रेडीमेड व्यावसायिकांनी दिली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मनोहर पंजवाणी, बालमुकुंद भिरड, डॉ प्रसन्नजीत गवई, रेडीमेड कापड व्यावसायिक हरीश रोहेडा, राजकुमार हेमनानी, अनिल चंदवानी, हासानंद टकरानी, दीपक जाधवानी, राजेश हेमनानी, जगदीश गुरबानी, मनीष टकरानी, अनिल राजपाल, संजय मोतियानी तसेच संदिप पंजवाणी उपस्थित होते.

Web Title: Readymade garments traders of Akoal Meet Prakash Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.