आरसीपी कमांडोचे पाकीट चोरीला, कोतवालीत तक्रार

By Admin | Updated: February 20, 2016 02:32 IST2016-02-20T02:32:23+5:302016-02-20T02:32:23+5:30

अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयही असुरक्षित.

RCP commander's wallet stolen, Kotwali complaint | आरसीपी कमांडोचे पाकीट चोरीला, कोतवालीत तक्रार

आरसीपी कमांडोचे पाकीट चोरीला, कोतवालीत तक्रार

अकोला: जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत असलेल्या एका आरसीपी कमांडोचे पाकीट शुक्रवारी चोरीला गेल्याचे प्रकरण समोर आले. यावरून आता जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयही असुरक्षित असल्याचे स्पष्ट होत आहे. सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार करण्यात आली आहे. शिवजयंतीनिमित्त शहरातील विविध कार्यक्रमांना पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी आरसीपी कमांडो यांना शुक्रवारी सकाळी ११ वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावण्यात आले होते. यावेळी सदर आरसीपी कमांडोही पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर झाला. त्यावेळी त्याच्या खिशातील पर्स चोरीला गेली किंवा गहाळ झाली. सदर कमांडोने पर्स शोधली, मात्र ती सापडली नाही. यामध्ये पॅन कार्ड, एटीएम कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यांसह रोख रक्कम व काही महत्त्वाचे दस्तावेज होते. सदर कमांडोने या प्रकरणाची तक्रार सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात केली. कमांडोची पर्स गहाळ झाली असती, तर ती शुक्रवार सायंकाळपर्यंत त्यांना परत देण्यात आली असती; मात्र त्यांची पर्स चोरीला गेल्याचा दाट संशय असून, याप्रकरणी त्यांनी तक्रारही केली आहे.

Web Title: RCP commander's wallet stolen, Kotwali complaint