दहा रुपयाचे नाणे चलनासाठी आता ‘आरबीआय’चा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 02:14 IST2018-02-12T02:13:30+5:302018-02-12T02:14:38+5:30
अकोला : दहा रुपयांची नाणी बंद होणार असल्याची अफवा गत वर्षभरापासून सातत्याने सुरू आहे. त्यामुळे अकोल्यातच नव्हे, तर अनेक ठिकाणी दहा रुपयांची नाणी दैनंदिन व्यवहारात स्वीकारताना अनेकजण नाक मुरडतात. त्यामुळे सर्वसामान्य चिल्लर दुकानदार यांना भरपूरवेळा आर्थिक झळही सोसावी लागते. आता ही बाब वरिष्ठ स्तरावर पोहोचल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेनेच नाणी चलनासाठी आता पुढाकार घेतला आहे.

दहा रुपयाचे नाणे चलनासाठी आता ‘आरबीआय’चा पुढाकार
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : दहा रुपयांची नाणी बंद होणार असल्याची अफवा गत वर्षभरापासून सातत्याने सुरू आहे. त्यामुळे अकोल्यातच नव्हे, तर अनेक ठिकाणी दहा रुपयांची नाणी दैनंदिन व्यवहारात स्वीकारताना अनेकजण नाक मुरडतात. त्यामुळे सर्वसामान्य चिल्लर दुकानदार यांना भरपूरवेळा आर्थिक झळही सोसावी लागते. आता ही बाब वरिष्ठ स्तरावर पोहोचल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेनेच नाणी चलनासाठी आता पुढाकार घेतला आहे. दहा रुपयांची नाणी दैनंदिन व्यवहारात स्वीकारणेबाबत अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे बाजारपेठेत दहा रुपयांची नाणी स्वीकारली जात नाहीत. याबाबत वृत्तपत्र आणि प्रसार माध्यमांनी अनेकदा प्रकाशझोत घातला. मात्र फारसा परिणाम जनमाणसावर झाला नाही. त्यामुळे अनेकांना दहाच्या नाण्यांसाठी बट्टादेखील सोसावा लागतो आहे. ही बाब अनेकांनी रिझर्व्ह बँकेच्या साइटवर लेखी स्वरूपात कळविली आहे. दहा रुपयांची नाणी का आणि कशासाठी स्वीकारली जात नाही, याबाबत मात्र कुणाकडे ठोस उत्तर नाही. त्यामुळे दहा रुपयांच्या नाणी चलनासाठी आता प्रत्यक्ष रिझर्व्ह बँकेने पुढाकार घेतला आहे. अनेकांना यासंदर्भात मोबाइलवर मॅसेज, तर काहींना रेकॉर्डेड कॉल येत आहेत. यासाठी नागरिकांनी आरबीआयच्या १४४४0 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.