शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

अश्लील व्हिडिओ दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 10:28 AM

अश्लील व्हिडिओ अल्पवयीन मुलीला दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

अकोला: जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या एका ९ वर्षीय अल्पवयीन मुलीला मोबाइलवर अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यावर शारीरिक अत्याचार करणाऱ्या ३० वर्षीय नराधमाविरुद्ध जुने शहर पोलीस ठाण्यात बलात्कार तसेच पोक्सो कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगेश ठाकरे असे आरोपीचे नाव असून, त्याला अटक करण्यात आली आहे.जुने शहरातील रहिवासी मंगेश देवीदास ठाकरे (३०) हा मजुरीचे काम करणारा युवक असून, त्याच्या शेजारीच रहिवासी असलेली ९ वर्षीय अल्पवयीन मुलगी त्याच्याकडे यायची. याच संधीचा फायदा घेत त्याने त्याच्या मोबाइलवरील अश्लील व्हिडिओ अल्पवयीन मुलीला दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर मुलगी घरी गेली असता रडत असल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले. आईने विचारणा केली असता अल्पवयीन मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर तिच्या शरीरावरील जखमा पाहून आईने तिला तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी पोलिसांनी चौकशी केली असता सदर मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे तिच्या आईने सांगितले. त्यानंतर जुने शहर पोलिसांनी तातडीने सर्वोपचार रुग्णालय गाठून मुलीच्या बयानावरून तसेच वैद्यकीय तपासणीच्या अहवालानंतर आरोपी मंगेश ठाकरे याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६, तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ९ आणि १० नुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपीस तातडीने अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीला २३ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा तपास जुने शहर पोलीस करीत आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार