Rape by showing a pornographic video to a minor girl | अश्लील व्हिडिओ दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
अश्लील व्हिडिओ दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अकोला: जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या एका ९ वर्षीय अल्पवयीन मुलीला मोबाइलवर अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यावर शारीरिक अत्याचार करणाऱ्या ३० वर्षीय नराधमाविरुद्ध जुने शहर पोलीस ठाण्यात बलात्कार तसेच पोक्सो कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगेश ठाकरे असे आरोपीचे नाव असून, त्याला अटक करण्यात आली आहे.
जुने शहरातील रहिवासी मंगेश देवीदास ठाकरे (३०) हा मजुरीचे काम करणारा युवक असून, त्याच्या शेजारीच रहिवासी असलेली ९ वर्षीय अल्पवयीन मुलगी त्याच्याकडे यायची. याच संधीचा फायदा घेत त्याने त्याच्या मोबाइलवरील अश्लील व्हिडिओ अल्पवयीन मुलीला दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर मुलगी घरी गेली असता रडत असल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले. आईने विचारणा केली असता अल्पवयीन मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर तिच्या शरीरावरील जखमा पाहून आईने तिला तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी पोलिसांनी चौकशी केली असता सदर मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे तिच्या आईने सांगितले. त्यानंतर जुने शहर पोलिसांनी तातडीने सर्वोपचार रुग्णालय गाठून मुलीच्या बयानावरून तसेच वैद्यकीय तपासणीच्या अहवालानंतर आरोपी मंगेश ठाकरे याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६, तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ९ आणि १० नुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपीस तातडीने अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीला २३ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा तपास जुने शहर पोलीस करीत आहेत.


Web Title: Rape by showing a pornographic video to a minor girl
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.