अजनी बु येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 18:00 IST2019-07-12T17:59:52+5:302019-07-12T18:00:01+5:30
दहा वर्षीय बालिका बुधवारी घरात एकटी असताना गावातीलच स्वप्नील विनोद डोंगरे रा. अंजनी बु याने तिच्या घरात प्रवेश करून तिच्यावर अत्याचार केला.

अजनी बु येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार
बार्शीटाकळी : पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अंजनी बु. येथील एक दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना १० जुलै रोजी घडली. या प्रकरणी आरोपी युवकाविरुद्ध बार्शीटाकळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.आरोपी पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
अजनी येथील दहा वर्षीय बालिका बुधवारी घरात एकटी असताना गावातीलच स्वप्नील विनोद डोंगरे रा. अंजनी बु याने तिच्या घरात प्रवेश करून तिच्यावर अत्याचार केला. घडलेली घटना पिडीत मुलीने आईला सांगितली. पिडीत मुलीच्या आईने बार्शीटाकळी पोलीस स्टेशन गाठून युवकाविरुद्ध फिर्याद दिली. या प्रकरणी बार्शीटाकळी पोलिसांनी आरोपी स्वप्नील डोंगरे विरुद्ध भादंवी कलम ३७६, ४,१२, पोस्को नुसार गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी गावातून पसार झाला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण,पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय ठाकरे, पोकॉ संतोष वाघमारे करीत आहेत. ( तालुका प्रतिनीधी )