दिव्यांग मुलीवर दोघांचा अत्याचार; एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 14:00 IST2020-04-08T14:00:25+5:302020-04-08T14:00:36+5:30
या प्रकरणात मूर्तिजापूर पोलिसांनी दोघांपैकी एकास गजाआड केले आहे.

दिव्यांग मुलीवर दोघांचा अत्याचार; एकास अटक
मूर्तिजापूर : शहरातील भीमनगर भागात राहणाऱ्या दोघा युवकांनी मूकबधिर असलेल्या १६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना ६ एप्रिल रोजी दुपारी २ वाजताच्या दरम्यान घडली घडली. या प्रकरणात मूर्तिजापूर पोलिसांनी दोघांपैकी एकास गजाआड केले आहे.
येथील भीमनगर भागात राहणारे राजेश वानखडे (३०) व गौरव भगत (२५) यांनी संगनमत करून एका १६ वर्षीय दिव्यांग मुलगी मूकबधिर असल्याचा फायदा घेऊन तिला आमिष दाखवून जवळच असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील शौचालयाजवळ बोलाविले. या निर्जनस्थळी राजेश वानखडे याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही बाब मुलीने तिच्या आईला सांकेतिक भाषेमध्ये सांगितली. आईने तातडीने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी राजेश वानखडे आणि गौरव भगत यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३७६ (३४), पॉस्कोनुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी गौरव भगत याला अटक केली. त्याचा दुसरा साथीदार राजेश वानखडे हा पसार झाला आहे. (शहर प्रतिनिधी)