रामदासपेठ पोलिसांनी दिले १८ गोवंशास जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:17 IST2021-02-05T06:17:38+5:302021-02-05T06:17:38+5:30
अकोला : रामदास पेठ पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या मोमीनपुरा येथे अवैध कत्तलीकरिता आणल्या गेलेल्या गोवंशास रामदास पेठ पोलिसांनी बुधवार पहाटे ...

रामदासपेठ पोलिसांनी दिले १८ गोवंशास जीवदान
अकोला : रामदास पेठ पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या मोमीनपुरा येथे अवैध कत्तलीकरिता आणल्या गेलेल्या गोवंशास रामदास पेठ पोलिसांनी बुधवार पहाटे सहा वाजता कारवाई करून जीवदान दिले. यावेळी पोलिसांनी अठरा गोवंशाची सुटका करून १७ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
रामदासपेठ पोलीस स्टेशन परिसरारील मोमीनपुराजवळ कत्तलीकरिता गोवंश जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बुधवार पहाटे सहा वाजेच्या सुमारास मोमीनपुरा येथे छापेमारी करून १८ गोवंशास जीवदान दिले. यावेळी पोलिसांनी अठरा गोवंश सह एमएच ३० बीडी ३२७७ व एमएच ३० बीडी २५३७ ह्या क्रमांकांच्या दोन टाटा इंट्रा गाड्या असा एकूण १८ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस दिसताच आरोपी घटनास्थळावर गाड्या सोडून पसार होण्यात यशस्वी झाले. याप्रकरणी आरोपींविरोधात प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही गाड्या पोलिसांनी जप्त केल्या असून, गोवंशास म्हैसपूर येथील गोशाळेत पाठवण्यात आले. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत इंगले, शेख हसन, किशोर गवली, संजय अकोटकर, गजानन खेडकर, अनसार शेख, स्वप्निल चौधरी, श्रीकांत पातोंड, विशाल चौहान यांनी केली.