रामकृष्ण येनकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:18 IST2021-04-06T04:18:19+5:302021-04-06T04:18:19+5:30

खानापूर: आगीखेड येथील रामकृष्ण नामदेव येनकर (६५) यांचे दि. २ एप्रिल रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन ...

Ramakrishna Yenkar passed away | रामकृष्ण येनकर यांचे निधन

रामकृष्ण येनकर यांचे निधन

खानापूर: आगीखेड येथील रामकृष्ण नामदेव येनकर (६५) यांचे दि. २ एप्रिल रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, चार मुली, नातवंडे असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.

(फोटो)

-------------------------------------

कुटुंब अर्थसाहाय्य योजनेत १५ लाभार्थींची निवड

बार्शीटाकळी: राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेंतर्गत बार्शीटाकळी तालुक्यातील १५ लाभार्थींची निवड करण्यात आली असून, या योजनेंतर्गत प्रति लाभार्थींना २० हजार रुपये धनादेशाद्वारे अनुदान म्हणून मिळणार आहे.

कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास शासनाच्या राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांतील वारसांना शासनाकडून राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेतून २० हजार रुपयांची मदत देण्यात येते. त्याकरिता बार्शीटाकळी तालुक्यातील १५ लाभार्थींना ही मदत मंजूर झाली असून, मदतीचे धनादेश दि.६ एप्रिल रोजी तहसील कार्यालयात लाभार्थ्यांना तहसीलदारांच्या हस्ते वाटप करण्यात येणार आहे.

Web Title: Ramakrishna Yenkar passed away