राकाँ अल्पसंख्याक विभाग प्रदेशाध्यक्षांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:14 IST2021-05-31T04:14:54+5:302021-05-31T04:14:54+5:30

............... चोखामेळा यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन अकोला : श्री रामनवमी शोभायात्रा समितीतर्फे संत चोखामेळा यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात ...

Rakan Minority Department State President felicitated | राकाँ अल्पसंख्याक विभाग प्रदेशाध्यक्षांचा सत्कार

राकाँ अल्पसंख्याक विभाग प्रदेशाध्यक्षांचा सत्कार

...............

चोखामेळा यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

अकोला : श्री रामनवमी शोभायात्रा समितीतर्फे संत चोखामेळा यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी राम भक्त व समितीच्या प्रत्येक कार्यामध्ये मार्गदर्शन करणारे लोकनेते भाऊसाहेब फुंडकर यांची पुण्यतिथीही साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष विलास अनासने होते, तर प्रमुख अतिथी म्हणून आ. गाेवर्धन शर्मा, अशोक गुप्ता, गिरीश जोशी, अनिल मानधने, गिरीराज तिवारी उपस्थित होते.

...............

धनगर समाज युवक संघटनेच्या वतीने अन्नधान्य वाटप

अकोला : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९६ व्या जयंतीनिमित्त मल्हार ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तथा धनगर समाज युवक संघटनेचे रविराज घोंगे यांनी कोरोना संकटात सापडलेल्या गोरगरीब लोकांना मदत म्हणून अन्नधान्य व सॅनिटायझर, मास्क वाटप केले. यावेळी उपस्थित शुभम तिडके, अमोल घोंगे, विठ्ठल कोगदे व सूरज घोंगे उपस्थित होते.

.......................

Web Title: Rakan Minority Department State President felicitated