कायंदे यांचा राकाँला रामराम

By Admin | Updated: September 18, 2014 00:40 IST2014-09-18T00:40:23+5:302014-09-18T00:40:23+5:30

सिंदखेडराजा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे माजी आमदार तोताराम कायंदे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार.

Rakahala Rama Ram of Kaindade | कायंदे यांचा राकाँला रामराम

कायंदे यांचा राकाँला रामराम

बुलडाणा : सिंदखेडराजा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे माजी आमदार व विद्यमान प्रदेश उपाध्यक्ष तोताराम कायंदे हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या प्रवेशाची १९ सप्टेबर ही तारीखही निश्‍चित झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सिंदखेडराजा मतदारसंघात कायंदे यांना मानणारा मोठा वर्ग असून, सामाजिक समीकरणातही त्यांचे नेतृत्व हे तुल्यबळ आहे. शरद पवार यांचे निष्ठावान सहकारी म्हणून कायंदे यांची ओळख आहे; मात्र गेल्या काही वर्षात कायंदे यांना पक्षाने महत्त्वाची जबाबदारी दिली नाही. प्रत्येक वेळी कायंदे यांनी पक्षाकडे उमेदवाराचा सातत्याने दावा केला होता. यावेळीसुद्धा ते विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. विशेष म्हणजे त्यांनी लोकसभेचीही उमेदवारी मागितली होती. आज सोशल मीडियावर कायंदे यांच्या सेनाप्रवेशाच्या अनुषंगाने बातम्या फिरत होत्या. अखेर कायंदे यांच्या शिवसेना प्रवेशाची तारीख निश्‍चित झाल्याची माहिती त्यांचे पुत्र डॉ. सुनील कायंदे यांनी दिली. माजी आमदार कायंदे यांनीही ह्यलोकमतह्ण शी बोलताना सेना प्रवेशाला दुजोरा दिला आहे.

Web Title: Rakahala Rama Ram of Kaindade