बेसबॉल स्पर्धेवर राजेश्‍वर कॉन्व्हेंटचे वर्चस्व

By Admin | Updated: September 3, 2015 00:24 IST2015-09-03T00:23:46+5:302015-09-03T00:24:01+5:30

वसंत देसाई क्रीडांगण येथे बुधवारी जिल्हास्तरीय शालेय बेसबॉल स्पर्धा पार पडली.

Rajeshwar Convent dominates baseball | बेसबॉल स्पर्धेवर राजेश्‍वर कॉन्व्हेंटचे वर्चस्व

बेसबॉल स्पर्धेवर राजेश्‍वर कॉन्व्हेंटचे वर्चस्व

अकोला: वसंत देसाई क्रीडांगण येथे बुधवारी जिल्हास्तरीय शालेय बेसबॉल स्पर्धा पार पडली. स्पर्धेवर शहर विभागात मुलींच्या गटात राजेश्‍वर कॉन्व्हेंट (शंकरलाल रामदेव अग्रवाल हायस्कूल)चे वर्चस्व राहिले. १४ व १९ वर्षाआतील मुलींच्या गटाचे विजेतेपद राजेश्‍वर कॉन्व्हेंटने पटकाविले. १४ वर्षाआतील मुलींच्या गटात शंकरलाल रामदेवजी अग्रवाल हायस्कूल विजयी ठरले. मोहरीदेवी खंडेलवाल स्कूलने उपविजेतेपद पटकाविले. स्कूल ऑफ स्कॉलर्स संघ तृतीयस्थानी राहिला. १७ वर्षांआतील गटात मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने विजय मिळविला. स्कूल ऑफस्कॉलर्स संघ उपविजेता राहिला. १९ वर्षाआतील गटात शंकरलाल रामदेव अग्रवाल हायस्कूल विजयी, स्कूल ऑफ स्कॉलर्स उपविजयी आणि एलआरटी ज्युनिअर कॉलेज संघाला तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले. ग्रामीण विभागात मुलांच्या गटात १४ वर्षाआतील व १७ वर्षाआतील गटाचे विजेतेपद एमराल्ड हाईटस् स्कूलने पटकाविले. स्पर्धेत पंच म्हणून पंकज कोकाटे, भूषण गाडगे, रामेश्‍वर राठोड, नारायण बत्तुले यांनी काम पाहिले. त्यांना अमित गोतमारे, सागर नीळे, राहुल खंडारे, तेजल खिलोसिया, समशेर रंदावा, शुभम चौखंडे, रितेश राठोड, ओम कोलते यांनी सहकार्य केले.

Web Title: Rajeshwar Convent dominates baseball