तेल्हारा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी

By Admin | Updated: June 1, 2017 20:19 IST2017-06-01T20:14:58+5:302017-06-01T20:19:59+5:30

आंबा, भुईमूग पिकांचे नुकसान

Rainfall with torrential winds in Telhara taluka | तेल्हारा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी

तेल्हारा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी

लोकमत न्यूज नेटवर्क

तेल्हारा : तालुक्यासह शहरात १ जून रोजी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी पडल्याने शेत पिकांचे नुकसान झाले.
संध्याकाळी आलेल्या अचानक वादळी वाऱ्याने लोणच्याचे आंब्याच्या कैऱ्या पडून जास्त नुकसान झाले. त्याचप्रमाणे भूइमुंग काढणी सुरू असल्याने आधीच कमी उत्पन्न, त्यात अचानक आलेल्या वादळी पावसाने मोठी धांदल उडाली व हाती येणाऱ्या पिकांचे नुकसान केले. वादळी वाऱ्याने विद्युत पुरवठा काही तास बंद होता.

Web Title: Rainfall with torrential winds in Telhara taluka