वर्हाडातील पावसाचे चित्र निराशाजनकच!
By Admin | Updated: July 23, 2014 00:53 IST2014-07-23T00:53:12+5:302014-07-23T00:53:12+5:30
राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली असताना, पश्चिम वर्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्हय़ांमध्ये मात्र पावसाचे चित्र निराशाजनकच आहे.

वर्हाडातील पावसाचे चित्र निराशाजनकच!
अकोला: राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली असताना, पश्चिम वर्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्हय़ांमध्ये मात्र पावसाचे चित्र निराशाजनकच आहे. मंगळवारी सकाळी ८.३0 वाजतापर्यंत या तीन जिल्हय़ात अवघ्या ३ सेंटिमीटर पावसाची नोंद झाली असून, काही तालुक्यांमध्ये तर अवघा एक सेंटिमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे. यावर्षी तब्बल दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर पावसाला सुरुवात झाल्याने, विदर्भातील पेरण्या रखडल्या असून, जलसाठेही कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. सोमवारपासून पश्चिम वर्हाडात पावसाला सुरुवात झाली असली तरी, पावसात दम नसल्याने, शेतात चार इंचाखाली पाणी पोहोचलेले नाही. त्यामुळे शेतकर्यांची चिंता वाढली आहे. अकोला जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. मंगळवारी रात्री पावसाचा जोर वाढला होता.