अकोल्यात १५ मिनिटे धुवाधार पाऊस; व्यावसायिकांची उडाली दाणदाण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 01:44 IST2018-03-12T01:44:35+5:302018-03-12T01:44:35+5:30
अकोला : जिल्ह्यात गत आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, रविवारी १.३० वाजताच्या सुमारास जवळपास १५ मिनिटे अवकाळी पावसाने अकोलेकरांची दाणदाण उडाली.

अकोल्यात १५ मिनिटे धुवाधार पाऊस; व्यावसायिकांची उडाली दाणदाण!
ठळक मुद्देरविवारी दुपारच्यावेळी १५ ते २० मिनिटे पाऊस बरसला
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यात गत आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, रविवारी १.३० वाजताच्या सुमारास जवळपास १५ मिनिटे अवकाळी पावसाने अकोलेकरांची दाणदाण उडाली.
मागच्या महिन्यात विदर्भासह राज्यात गारपीट झाली होती. पिके, फळांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. पण, अवकाळी पाऊस पिच्छा सोडत नसल्याचा प्रत्यय येत आहे. रविवारी दुपारच्यावेळी १५ ते २० मिनिटे पाऊस बरसला. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांची चांगलीच धावपळ झाली. या पावसामुळे काहीवेळ रस्ते निर्मणूष्य झाले होते. शहरात सखल भागात पाणी साचल्याने वाहनधारकांना पाण्यातून वाहने काढावी लागली.