पाऊस चांगला, पण उत्पादन घटणार!

By Admin | Updated: August 2, 2016 00:20 IST2016-08-02T00:20:54+5:302016-08-02T00:20:54+5:30

संततधार पावसाचा पिकावर दुष्परिणाम.

Rain is good, but the production will decrease! | पाऊस चांगला, पण उत्पादन घटणार!

पाऊस चांगला, पण उत्पादन घटणार!

राजरत्न सिरसाट
अकोला : यावर्षी पाऊस चांगला झाला आहे. पण, अतवृष्टी आणि सतत पाऊस सुरू असून, सूर्यप्रकाश नसल्याने पिकांच्या मुळांपर्यंत प्राणवायू पोहोचत नसल्याने सर्वच खरीप पिकांवर दुष्परिणाम होत असून, विदर्भातील सोयाबीन, तूर व कापूस क्षेत्र बाधित झाले आहे. याचे प्रतिकूल परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामात विदर्भात कापसाचा पेरा १२ लाख हेक्टरवरू न १0 लाख हेक्टरपर्यंत घसरला आहे. सोयाबीनचे क्षेत्र १४ लाख हेक्टरवर गेले आहे. पूर्व विदर्भात धानाचे क्षेत्र जवळपास सात लाख हेक्टर आहे. कडधान्य आठ लाख, तर गळित धान्य जवळपास दोन लाख हेक्टर आहे. यावर्षी जून महिन्याच्या शेवटी चांगला पाऊस झाल्याने शेतकर्‍यांनी जून व जुलै महिन्यात जवळपास ९0 टक्के क्षेत्रावर पेरणी केली. पण, पाऊस उसंत देत नसल्याने विदर्भातील काही ठिकाणची शेती पाण्याखाली गेली असून, ३५ ते ४0 दिवसांपासून पिकांना प्रकाशसंश्लेषणासाठी सूर्यप्रकाश मिळाला नसल्याने सर्व पिकांची अन्नप्रक्रिया तयार करण्याची गती मंदावली आहे.

सर्वच पिकांच्या नुकसानाची शक्यता
सततच्या पावसामुळे मूग, उडिदाचे नुकसान होत असून, पश्‍चिम विदर्भातील साडेचार हेक्टरवरील तूर पीक धोक्यात आले आहे. यातील काही पिकांचे नुकसानदेखील झाले आहे. सोयाबीन तग धरू न आहे. पण, प्रकाशसंश्लेषण नसल्याने सोयाबीन पिकावर मूळकूज, खुळकूज व कॉलर रॉट रोग येण्याची शक्यता बळावली आहे. शेतातील डवरणी, निंदण रखडले आणि सूर्यप्रकाश नसल्याने कापूस पिकाची वाढ खुंटली असून, तणाने शेतं व्यापली आहेत. तूर, ज्वारी ही पिके पिवळी पडत आहेत. जुलै महिन्यातील पावसाने शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली आल्याने त्या पिकांचे नुकसान झाले आहे.

लागवड खर्चात वाढ, नफ्यात घट
सतत पाऊस सुरू असल्याने पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करणे बंद आहे. तणनाशकाची फवारणी करता आली नाही. काही शेतकर्‍यांनी फवारणी केली पण, त्यावर लगेच पाऊस येत असल्याने शेतकर्‍यांच्या लागवड खर्चात वाढ व नफ्यात घट येण्याची शक्यता आहे.

-किंडीचा प्रादुर्भाव
*सोयाबीनला चक्रभुंगा, हिरवी उंटअळी, लष्करी अळीचा धोका
*कापसावर रसशोषण करणार्‍या किडींचा प्रादुर्भाव, बुरशी जन्य रोग, गुलाबी बोंडअळी
*मूग पिकावर रसशोषण किडींचा प्रादुर्भाव
*ज्वारीवर नाकतोड्याच्या प्रादुर्भावाची शक्यता
* संत्र्यावर फायटोपथेरा; बागा वाळण्याचा धोका

पाऊस चांगला, पण उत्पादन घटणार!
 सततच्या पावसामुळे आणि प्रकाश संश्लेषण होत नसल्याने पिकांच्या मुळांपर्यंत प्राणवायू पोहोचत नाही. परिणामी, पिके पिवळी पडतात, तर मावा किडीमुळे सोयाबीनवर ह्यमोझ्ॉकह्ण तर पांढर्‍या माशीमुळे ह्यपिवळा मोझ्ॉकह्ण येण्याची भीती असते. या स्वरू पाच्या पावसामुळे संत्र्यावर ह्यफायटोपथेराह्ण येऊन बागा वाळण्याची शक्यता असते. तेव्हा शेतकर्‍यांनी शेतातील पाणी बाहेर काढावे व डवरणी करावी.
- डॉ.आर.एम. गाडे,
वनस्पती रोग शास्त्रज्ञ,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

Web Title: Rain is good, but the production will decrease!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.